महिलांना आडकाठी करणाऱ्या शबरीमला मंदिर समितीचा 'यु टर्न'!

महिलांना आडकाठी करणाऱ्या शबरीमला मंदिर समितीचा 'यु टर्न'!

मंदिर व्यवस्थापन समितीने घेतलेल्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आडमुठी भूमिका घेणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (TDB) आता यु टर्न घेतला आहे. शबरीमला मंदिरात आता सर्वच वयोगटातल्या महिलांना पुजेचा अधिकार आहे. आमची त्यासाठी कुठलीही हरकत नाही अशी भूमिका बोर्डाच्या वकिलाने घेतली. याच बोर्डाकडून मंदिराचं व्यवस्थापन केलं जातं. त्यामुळे त्यांच्या भूमिकाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

सुप्रीम कोर्टानं 18 जुलै 2018 ला दिलेल्या निकालात सर्वच वयोगटातल्या महिलांना पुजेचा हक्क असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं. या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करतानाच अनेक संघटनांनी त्याला विरोध केला. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

त्यावेळी भूमिका मांडताना मंदिर व्यवस्थापन समितीने घेतलेल्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सरन्यायाधीश अध्यक्ष असलेल्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर सुनावणी करत आहे.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल?

18 जुलै 2018 रोजी केरळमधल्या सुप्रसिध्द शबरीमला मंदिरात पुरुषांप्रमाणंच महिलांनाही प्रवेश आणि पुजा करण्याचा अधिकार आहे अशी महत्वाची भूमिका सुप्रीम कोर्टानं घेतलीये. महिलांना प्रवेश देण्यावरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं महिलांच्या मंदिर प्रवेशासंदर्भात ही महत्वाची टिप्पणी केली आहे.

तत्कालीन मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांनी मंदिर प्रशासनाला खडे बोल सुनावले. कुठल्या आधारावर महिलांना प्रवेशापासून रोखलं जातं असा सवाल कोर्टानं केला. असं कृत्य हे संविधानाच्या विरोधात आहे असंही कोर्टानं सुनावलं आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश डी.वाय.चंद्रचूड यांनी मंदिर ही कुणाची खाजगी मालकी नाही, जी जागा सार्वजनिक आहे, तिथे जाण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही. संविधानाने पुजा करण्याचं स्वातंत्र्य जितकं पुरुषांना दिलंय तितकंच महिलांनाही दिलंय असंही आपल्या निकालात म्हटलं होतं.

चोरीच्या संशयावरून लोकांना लाथा-बुक्यांनी मारत राहिले भाजपचे कार्यकर्ते, VIDEO व्हायरल

First published: February 6, 2019, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading