इंडिया की भारत? या वादावर आज पडणार पडदा, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

इंडिया की भारत? या वादावर आज पडणार पडदा, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

आता असे प्रश्न उपस्थित झाले आहे की जर देश एक आहे तर नाव एक का नाही? दरम्यान या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात एका याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : संविधानातून कलम 1मध्ये असे लिहिले आहे की 'इंडिया' म्हणजेच 'भारत'. मात्र आता असे प्रश्न उपस्थित झाले आहे की जर देश एक आहे तर नाव एक का नाही? दरम्यान या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याचा असा युक्तिवाद आहे की, इंडिया हा शब्द गुलामगिरीचं लक्षण आहे आणि म्हणून त्याऐवजी 'भारत' किंवा 'हिंदुस्थान' हा शब्दा वापरावा.

घटनेतील कलम 1 मध्ये सुधारणा करून इंडिया या शब्द हटवावा अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे. कलम 1 मध्ये भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ आहे, असं नमुद केलं आहे. त्याऐवजी इंडिया हा शब्द काढून टाकावा आणि भारत किंवा हिंदुस्थान अशी सुधारणा करावी. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये असं म्हटले आहे की इंग्रजी नाव हटवणं हे प्रतीकात्मक असेल, मात्र ते आपल्या राष्ट्रीयत्वाबद्दल, विशेषत: भविष्यातील पिढीसाठी अभिमानाचं लक्षण असेल. तसेच, इंडियाच्या जागी भारत हा शब्द वापरल्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात आपल्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षांचे औचित्य सिद्ध होईल.

उमा भारती यांनीही प्रश्न उपस्थित केले

या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते उमा भारती यांनी दोन दिवसांपूर्वी एकामागून एक सात ट्विट केले. उमा भारती म्हणाल्या, 'एक देश किंवा एका व्यक्तीची दोन नावं नसतात. जसं की सूर्यप्रकाश that is सनलाइट असं कोणाचे नाव नसेल. तसेच इंडिया that is भारत कोणाचंही नाव असणं हास्यास्पद आहे'. उमा भारती असेही म्हणाल्या की, 'कदाचित भारत माता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्याची वाट पाहत होत्या. आता त्यांच्या कपाळावरील इंडिया या शब्दाचा डाग आम्ही पुसून टाकू'. त्यामुळं आज या याचिकेवर होणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

काय आहे भारत नावाचा इतिहास?

असं म्हटलं जातं की, महाराजा भरतने संपूर्ण भारताचा विस्तार केला. त्यामुळे या देशाचं नाव त्यांच्या नावावर ठेवले. जेव्हा तुर्क आणि इराणी लोक मध्ययुगात येथे आले, तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्यात प्रवेश केला. त्या सिंधूचा उच्चार हिंदू झाला. त्यामुळं हिंदूंच्या देशाला हिंदुस्थान असं नाव पडलं. जेव्हा इंग्रज आले तेव्हा त्यांनी या देशाचे नाव सिंधू खोऱ्याच्या आधारे इंडिया असं नाव ठेवलं, कारण त्यांना भारत किंवा हिंदुस्थान म्हणणे गैरसोयीचे होते. दरम्यान आता एवढ्या वर्षांनंतर इंडिया हे नाव बदलून भारत किंवा हिंदूस्थान करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली जाणार आहे.

First published: June 2, 2020, 10:02 AM IST

ताज्या बातम्या