S M L

सुप्रीम कोर्ट बहुपत्नीत्व ,हलालाची संविधानिक वैधता तपासणार

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर विचार करणार आहे. तिहेरी तलाकच्या वेळी 3-2 अशा बहुमताने सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला होता.निकाह हलालामध्ये तिहेरी तलाकनंतर परत त्याच स्त्रीशी लग्न करायचं असल्यास तिला दुसऱ्या एखाद्या पुरूषाशी लग्न करावं लागतं.

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 26, 2018 04:51 PM IST

सुप्रीम कोर्ट  बहुपत्नीत्व ,हलालाची संविधानिक वैधता तपासणार

26 मार्च:  तिहेरी तलाक नंतर आता सुप्रीम कोर्ट इस्लाममधील बहुपत्नीत्व ,हलाला निकाह या  रूढींची आणि प्रथांची संविधानिक वैधता तपासणार आहे. तिहेरी तलाकवर निकाल देताना निकाह हलालाचा विषय चर्चेसाठी मुक्त असल्याचं सरकारनं म्हटलं होतं. पण आता याची वैधता सुप्रीम कोर्ट तपासणार आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा  यांच्या अध्यक्षतेखाली एक पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर विचार करणार आहे. तिहेरी तलाकच्या वेळी 3-2 अशा बहुमताने सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला होता.निकाह हलालामध्ये तिहेरी तलाकनंतर परत त्याच स्त्रीशी लग्न करायचं असल्यास तिला दुसऱ्या एखाद्या पुरूषाशी लग्न करावं लागतं. त्यानंतर त्याने तलाक दिल्यावर पुन्हा पहिल्या पतीशी ती लग्न करू शकते. बहुपत्नीत्व आणि हलाला सारख्या प्रथांमुळे संविधानील स्त्री पुरूष समानता, समतेचा अधिकारांचं  उल्लंघन होतंय का हे  आता सुप्रीम कोर्ट चाचपणार आहे. तसंच त्यावर चर्चा करून निकालही देईल

तिहेरी तलाकचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यावर बऱ्याच धार्मिक संघटनांनी सुप्रीम कोर्टावर टीका केली होती. आता यावर सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close