अयोध्या विवाद: रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अयोध्या विवाद: रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या महत्वाच्या सुनावणीकडे लागलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या महत्वाच्या सुनावणीकडे लागलं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीआधी मंदिराचं बांधकाम सुरू करा असा अखिल भारतीय आखाडा परिषदेने इशारा दिला आहे.

विजयादशमी मेळाव्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाला कायदा करून राम मंदिर बांधण्याचा सल्ला दिला होता. मात्र भाजपने हा निर्णय सर्वस्वी न्यायालयावर सोडला आहे.

दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घातलं. त्यासाठी भागवतांनी बाप्पाचा विधीवत अभिषेकही केला. अभिषेकादरम्यान भटजींनी राम मंदिर लवकर व्हावं यासाठी गुरूजींच्या सूचनेनुसार संस्कृतमध्ये खास मंत्रही म्हटले.

VIDEO : भाजप नेत्याने लगावले बार डान्सरसोबत ठुमके, उधळल्या नोटा!

निवडणुकीआधी राम मंदिर बांधा अन्यथा देशातील संत महंत भाजपचा पाठिंबा काढून घेतील असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेने भाजपला दिला आहे. राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या? असा सवाल त्यांनी केला. शिवाय नोटाबंदी एक क्षणात झाली, तसे राम मंदिर का होऊ शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर बांधकामाला सुरुवात केली जाईल असे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले होतं. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपा राम मंदिरचा मुद्दा घेऊन निवडणूकीत उतरणार हे स्पष्ट आहे.

2014 च्या निवडणूकीत भाजपाने राम मंदिर आयोध्येत बांधू असे अश्वासन दिलं होते आणि आता निवडणुकांच्या तोंडावर याची अमलबजावणी होणार असं दिसतं आहे.

काय आहे राम मंदिराचा वाद?

1992 साली बाबरी मशीद पाडली गेली होती. या गोष्टीला बरोबर 26 वर्षं पूर्ण होत असतानाच सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीस सुरूवात होणार आहे. याप्रकरणी  २०१० साली अलाहाबाद हायकोर्टानं निर्णय दिला होता. हायकोर्टानं अयोध्येमधली विवादीत जागा तीन भागांमध्ये विभागली होती. सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि भगवान राम लल्ला, अशी ही विभागणी होती.

हायकोर्टाच्या निकालाविरूद्ध 13 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. राम मंदिराच्या बाजूनं युक्तिवाद मांडण्यासाठी सुप्रसिद्ध आणि वरिष्ठ वकिलांची फळी उभी राहणार आहे. यामध्ये के पराशरन, सी एस वैद्यनाथन आणि सौरभ समशेरी यांचा समावेश आहे. तर सॉलिसीटर जनरल तुषार मेहता उत्तर प्रदेश सरकारची बाजू माडंणार होते.

VIDEO : बापरे!, एस्केलेटरमध्ये अडकला १० वर्षांच्या मुलाचा हात

बाबरी मशीद  1528 साली बाबर या मुघल बादशहाने बांधली होती. त्यापूर्वी तिथे रामाचं मंदिर होतं असं हिंदुंचं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी बाबरी मशीद आहे त्याच ठिकाणी प्रभु श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता अशी हिंदुची मान्यता आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष चालू असलेल्या या खटल्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2018 08:02 AM IST

ताज्या बातम्या