मराठी बातम्या /बातम्या /देश /

नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचाही दणका, बंगल्यावर हातोडा चालवण्याचे BMC ला आदेश

नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचाही दणका, बंगल्यावर हातोडा चालवण्याचे BMC ला आदेश

बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. 3 महिन्यात बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले

बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. 3 महिन्यात बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले

बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. 3 महिन्यात बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : मुंबईतील अधिश बंगला अवैध बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही दणका दिला आहे. बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. 3 महिन्यात बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणी मुंबई कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. तसंच अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत 10 लाखांचा दंड ठोठावला असून मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास परवानगीही दिली आहे. या निर्णयाविरोधात नारायण राणेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असून हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे.

('फडणवीसांना त्रास दिला आणि त्याच ब्राह्मणाने मराठा समाजाची झोळी 2017 ला भरली', तानाजी सावंत यांचं विधान)

नारायण राणे यांच्यासाठी वेगळा न्याय देवू शकत नाही. सर्वांना समान न्याय देणे हे कोर्टाचे काम आहे. जर राणे यांना दिलासा दिला तर मुंबईत अशा अनेक याचिका दाखल होईल. त्यामुळे हे अवैध बांधकाम पाडण्याची गरज आहे, असं परखड मत कोर्टाने नोंदवलं.

काय आहे प्रकरण?

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्याबाबत अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथकाने १८ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात जाऊन तपासणी केली आणि नोटीसही बजावली.

(नारायण राणेंना कोर्टाचा दणका, 10 लाखांचा ठोठावला दंड, मुंबई पालिकेचा बंगल्यावर हातोडा पडणारच!)

आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या संदर्भात तक्रार केली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली होती.

संतोष दौंडकर यांनी आरोप केला आहे की, नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले आहे. तसेच कोस्टर रेग्युलेशन झोन (सीआरझेड) Coastal Regulations Zone नियमांचे उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात आला असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत समुद्रापासून 50 मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आला.

First published: