लष्करातल्या महिलांसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, केंद्राला फटकारलं

लष्करातल्या महिलांसाठी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, केंद्राला फटकारलं

मात्र महिला अधिकाऱ्यांना जास्त कामं ही प्रशासकीय स्वरुपाचीच देण्यात येत होती. मात्र आता ही कोंडी फुटणार असून आघाडीवरही नियुक्ती होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी : लष्कारातल्या महिलांसाठी सुप्रीम कोर्टाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. लष्करात महिलांसाठी स्थायी कमिशन निर्माण करा असा आदेश कोर्टानं दिला आहे. या आधी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला होता. मात्र काही तांत्रिक कारणं देत केंद्राने याबाबत निर्णय घेतला नव्हता. तसेच त्याला सुप्रीम कोर्टात आव्हानही दिलं होतं. आता समानतेच्या मुद्यावरून केंद्राने हा निर्णय दिला असून केंद्राला फटकारलं आहे. महिलांच्या प्रश्नांवर मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महिलांच्या स्थायी कमिशनचा मार्ग मोकळा झालाय. लष्करामध्ये महिलांबाबत जी कोंडी निर्माण झाली होती ती फुटण्यासाठी या निर्णयाने मोठी मदत होणार आहे.

कोर्टाने म्हटलंय की, महिलांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे. असं न करणं हे त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखं आहे. महिलांना कमांड पोस्टिंग देता येणार नाही. शत्रू राष्ट्र याचा फायदा उठविण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर हे काम महिला अधिकाऱ्यांना कितपत झेपेल याबाबतही शंका व्यक्त करण्यात आली होती.

केंद्राचे हे सर्व तर्क कोर्टाने फेटाळून लावले आहेत. कोर्टाने म्हटलंय की खऱ्या अर्थना समानता आणायची असेल तर महिलांना सर्व अधिकार दिलेच पाहिजेत. त्यांच्या क्षमतांबाबत शंका उपस्थित करू नका तर आपल्या मानसिकतेत बदल करा असंही कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं आहे.

गेली अनेक वर्ष महिलांना लष्करात महत्त्वाच्या आघाड्यांवर पोस्टिंग देण्यावरून शंका व्यक्त केली जातेय. गेल्या काही वर्षात लष्कारत अनेक विभागांमध्ये महिलांना प्रवेश देण्यात येत होता. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं नेतृत्वही महिला अधिकाऱ्याने केलं होतं. मात्र महिला अधिकाऱ्यांना जास्त कामं ही प्रशासकीय स्वरुपाचीच देण्यात येत होती. मात्र आता ही कोंडी फुटणार असून आघाडीवरही नियुक्ती होणार आहे.

First published: February 17, 2020, 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading