Home /News /national /

Whatsapp: सर्वोच्च न्यायालयानं पाठवली नोटीस, गोपनियतेच्या मुद्द्यावर खडसावलं

Whatsapp: सर्वोच्च न्यायालयानं पाठवली नोटीस, गोपनियतेच्या मुद्द्यावर खडसावलं

आता सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court)व्हॉट्सअॅप आणि फेसबुकला (Facebook)एक नोटीस पाठवत उत्तर मागितलं आहे. लोकांची गोपनियता अत्यंत महत्त्वाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

    नवी दिल्ली 15 फेब्रुवारी : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्हॉट्सअॅपनं (Whatsapp) आपल्या प्रायवेसी पॉलिसीमध्ये बदल केले. यानंतर अनेकांनी हे अॅप मोबाईलमधून हटवण्याचा निर्णय घेतला. याचा कंपनीला बसणारा फटका पाहाता कंपनीनं लगेचच या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court)व्हॉट्सअॅप आणि फेसबुकला (Facebook)एक नोटीस पाठवत उत्तर मागितलं आहे. लोकांची गोपनियता अत्यंत महत्त्वाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुढं म्हटलं, की तुम्ही दोन तीन ट्रिलियनची कंपनी असू शकता मात्र लोकांच्या मनामध्ये भीती आहे, की त्यांचा डाटा सुरक्षित नसून तो विकला जात आहे. लोकांच्या गोपनियतेची सुरक्षा करणं आपलं कर्तव्य आहे. एका जनहित याचिकेत असं म्हटलं गेलं होतं, की व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या नव्या प्रायवसी पॉलिसीमुळे लोकांची गोपनियता धोक्यात येत आहे आणि डाटा लीक केला जात आहे. असाही आरोप केला गेला आहे, की व्हॉट्सअॅप आणि फेसबुक युरोपसाठी वेगळे आणि भारतासाठी वेगळे मापदंड ठेवत असून हे चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही कंपन्यांना यासाठी उत्तर मागितलं आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) आणि फेसबुकच्या (Facebook) प्रायव्हसी धोरणांमुळे मोठा गदारोळ माजला होता. अनेकांनी ही माध्यमं न वापरण्याचाही निर्धार केला होता; मात्र नंतर या कंपन्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने पुन्हा सारं जवळपास पूर्ववत झालं. मात्र, नंतर व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय म्हणून भारतानं संदेस हे नवं अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला. या पॉलिसीचा व्हॉट्सअॅपला काही प्रमाणात फटका बसला, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Facebook, Supreme court, Whatsapp

    पुढील बातम्या