Home /News /national /

'आईची काळजी घ्यायला मोठं घर नाही, मोठं मन असावं लागतं'; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

'आईची काळजी घ्यायला मोठं घर नाही, मोठं मन असावं लागतं'; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

आई म्हातारी झाली तरीही ती मुलांचाच विचार करते. मात्र अनेक ठिकाणी आईला मारहाण केल्याच्या आणि घरातून बाहेर काढल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात.

    नवी दिल्ली, 17 मे : आई आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्व काही पणाला लावण्यास नेहमी तयार असते. मुलांच्या सुखात तिचं सुख असतं. आई म्हातारी झाली तरीही ती मुलांचाच विचार करते. मात्र अनेक ठिकाणी आईला मारहाण केल्याच्या आणि घरातून बाहेर काढल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. 89 वर्षांची एक ज्येष्ठ महिला वैदेही सिंह यांच्या मुली पुष्पा तिवारी आणि गायत्री कुमारने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी दिल्यानुसार, त्यांचा भाऊ आईची काळजी घेत नव्हता. बहिणींना आपल्या भावाला असाही आरोप केला की, भावाने आईची संपत्ती स्वत:च्या नावावर करून घेतली. पुष्पा आणि गायत्रीचं म्हणणं आहे की, तिच्या आईला डिमेन्शिया आहे. त्यामुळे आईची कस्टडी त्यांना दिली जावी. म्हणजे ते आईची काळजी घेऊ शकतील. काळीज मोठं असावं लागतं... या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती डीवाई चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितलं की, मुली आपल्या आईची जबाबदारी घेऊ शकतात. मुलगाही आपल्या आईची भेट घेऊ शकतो. याबाबत मुलाकडून युक्तिवाद करताना वकिलाने सांगितलं की, पुष्पा आणि गायत्री आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि मुलींजवळ आईला ठेवायला जागा नाही. यावर कोर्टाने सांगितलं की, तुमच्याकडे किती मोठं घर आहे हा प्रश्न नाही तर आईची काळजी घेण्यासाठी तुमचं किती मोठं काळीज आहे, हा मुद्दा आहे. या प्रकरणा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे की, महिलेची कोणतीही संपत्ती आता ट्रान्सफर होऊ शकणार नाही. याशिवाय न्यायालयाने आईची कस्टडी मुलींना देण्याच्या प्रश्नावर मुलाकडून मंगळवारपर्यंत उत्तर मागितलं आहे. मुलींना मार्च महिन्यात याचिका दाखल केली होती. ज्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात मुलाने आईला दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात दाखल केलं होतं. यानंतर आईला कोणा अज्ञात ठिकाणी ठेवलं होतं आणि मुलींना भेटायला देत नव्हता. कोर्टाच्या आदेशानंतर दोन्ही मुलींना आईला भेटू दिलं.  

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mother, Supreme court

    पुढील बातम्या