IT रिटर्न भरा आधारमुक्त, आता आधारकार्ड पॅनकार्डशी जोडण्याची आवश्यकता नाही

IT रिटर्न भरा आधारमुक्त, आता आधारकार्ड पॅनकार्डशी जोडण्याची आवश्यकता नाही

घटनापीठाचा निर्णय होईपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.

  • Share this:

09 जून : आधारकार्ड पॅनकार्डशी जोडण्याच्या  केंद्र सरकारच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. घटनापीठाचा निर्णय होईपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.

सुप्रीम कोर्टाने आर्थिक व्यवहाराला आता आधारमुक्त केलंय. आयकर अधिनियमानुसार आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आणि पॅनकार्ड तयार करण्यासाठी आधारकार्ड जोडणे अनिवार्य होतं.

पण आज सुप्रीम कोर्टाने ज्यांच्याकडे आधारकार्ड नाहीये, त्यांना आधारकार्ड शिवाय पॅनकार्डद्वारे आयकर रिटर्न भरण्यास परवानगी दिलीये. पण ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्यांना आपलं खातं लिंक करावं लागणार असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.

न्यायमूर्ती ए.के.सिकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आधारकार्डबाबत निर्णय राखून ठेवला होता. या याचिकांमध्ये आयकर अधिनियम कलम 139 एए याला आव्हान देण्यात आलं होतं. ज्यात यावर्षीच्या बजेट आणि वित्त अधिनियम 2017 मध्ये जारी करण्यात आलंय.

आयकर अधिनियम कलम 139 एए नुसार एक जुलैपासून आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी पॅनकार्डसोबत आधारकार्ड लिंक करणे आवश्यक होतं.

First published: June 9, 2017, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading