Elec-widget

सर्वोच्च न्यायालयच म्हणाले, आता काश्मीरसाठी वेळ नाही!

सर्वोच्च न्यायालयच म्हणाले, आता काश्मीरसाठी वेळ नाही!

जम्मू-काश्मीर संदर्भातील सर्व याचिका एकत्रपणे घटनापीठाकडे पाठवण्यात आल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: जम्मू-काश्मीर(Jammu Kashmirला विशेष अधिकार देणारे कलम 370 (Article 370) आणि 35 A रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिका एकत्रपणे घटनापीठाकडे पाठवण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश (CJI) रंजन गोगोई (CJI Ranjan Gogoi)यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की सध्या अयोध्या प्रकरणा(Ayodhya Case)ची नियमित सुनावणी सुरु आहे. अशा परिस्थितीत काश्मीरसाठी वेळ नाही. सरन्यायाधीशांनी याआधीच हे देखील स्पष्ट केले आहे की, अयोध्या प्रकरणाची सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंतच होणार आहे. तोपर्यंत सुनावणी पूर्ण झाली तरच निकाल लागेल.

काश्मीर संदर्भात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. या सर्व याचिका एकत्र करण्यात आल्या आणि त्या घटनापीठाकडे पाठवण्यात आल्या. याचिकेत काश्मीरमध्ये पत्रकारांवर घालण्यात आलेले निर्बंध, राजकीय नेत्यांची नजरकैद आदी गोष्टींचा समावेश आहे. न्या.एन.व्ही.रमण यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ काश्मीर संदर्भातील सर्व याचिकांवर मंगळवारासून सुनावणी करणार आहे.

... तर निकालाची अपेक्षा करू नका

अयोध्या खटल्याची सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली पाहिजे. जर सुनावणी तोपर्यंत पूर्ण झाली नाही तर याबाबत निर्णय देण्याची शक्यता संपेल असे, न्या.गोगोई यांनी 26 सप्टेंबर रोजी सांगितले होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अत्यंत संवेदनशील अशा या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याआधी देखील न्यायालयाने सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली पाहिजे, असे सांगितले होते. या मागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सरन्यायाधीश 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळेच त्यांच्या निवृत्तीआधी निर्णय होण्याची शक्यता आहे. अयोध्या प्रकरणी निकाल देता यावा यासाठी न्यायालयाने रोज एक तास अतिरिक्त सुनावणी करण्याची तयारी दाखवली आहे. इतक नव्हे तर गरज असेल तर शनिवारी सुनावणी करण्याची तयारी कोर्टाने दर्शवली आहे.

कलम 370च्या जोरावर महाराष्ट्र आणि हरियाणा जिंकू

Loading...

भाजपने कलम 370चा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात देखील आणला आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, कलम 370 हटवल्याचा फायदा पक्षाला केवळ उत्तर प्रदेशमधील 11 पोटनिवडणुकीत नाही तर महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीत होणार आहे. या दोन्ही राज्यात आम्ही विजयी होऊ, असे मौर्य म्हणाले. 370 रद्द केल्यामुळे जनता आनंदी आहे. त्यामुळे आमचाच विजय होईल.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2019 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...