S M L

पुरुषाकडून पुरूषावर बलात्कार नाही, कोर्टाने याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टाने पुरूषाकडून पुरुषावर होणाऱ्या बलात्कार संबंधीत याचिका फेटाळून लावली आहे.

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2018 07:01 PM IST

पुरुषाकडून पुरूषावर बलात्कार नाही, कोर्टाने याचिका फेटाळली

02 फेब्रुवारी : सुप्रीम कोर्टाने पुरूषाकडून पुरुषावर होणाऱ्या बलात्कार संबंधीत याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत बलात्कार सारख्या गुन्ह्यात जेंडर मुक्त करण्याची मागणी केली होती.

पुरुषांवर बलात्कार झाला तर हा खटला कलम 377 अंतर्गत शिक्षा दिली जाते. अशा गुन्ह्यांमध्ये आरोप हा बलात्कार नाहीतर अनैसर्गिक सेक्स गटात मोडला जातोय.

काय आहे प्रकरण ?या याचिकेत समलैंगिकता हा गुन्ह्याच्या कक्षेतून दूर करावे आणि लैंगिक शोषण सारखे प्रकरणं लैंगिक-तटस्थताच्या आधारावर पाहिले जावेत अशी मागणी करण्यात आली होती. लैंगिक अत्याचार प्रकरणात लिंगाच्या आधारावर ठरवू नये. हा पुरुषांच्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे असा युक्तिवादही करण्यात आला होता. मात्र, ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. आणखी अशीच एक याचिका खालच्या कोर्टात आहे.

सध्या काय आहे परिस्थिती

भारतात जर एखाद्या पुरूषावर पुरूषाने बलात्कार केला तर त्याच्यावर भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 377 नुसार शिक्षा मिळते. पण जोपर्यंत कुणी तक्रार करत नाही तोपर्यंत कारवाई केली जात नाही. कलम 377 चा कायदेशीर वापर मर्यादीत आहे. या कलमाचा वापर पुरुषांसोबत जबरदस्तीने झालेल्या लैंगिक संबंधानंतर केला जातोय. परंतु, महिला आणि पुरुषा दरम्यान सहमतीने अनैसर्गिक संबंध आले तर असे प्रकरण ही समाविष्ट करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 07:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close