मराठी बातम्या /बातम्या /देश /अनिल देशमुखांचा खेळ संपला? सुप्रीम कोर्टानेही दार केले बंद!

अनिल देशमुखांचा खेळ संपला? सुप्रीम कोर्टानेही दार केले बंद!

ईडीने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

nनवी दिल्ली, 16 ऑगस्ट : 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra home minister Anil Deshmukh) अडचणीत सापडले आहे. ईडी (Enforcement Directorate) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात (supreme court) याचिका दाखल केली. पण, ती याचिकाही फेटाळून लावण्यात आली आहे.

अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे ईडीचा ससेमिरा कायम आहे. ईडीने नोटीसांवर नोटीसा बजावून देखील देशमुख चौकशीला हजर झाले नाही. उलट, ईडीने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी कारवाई टाळण्यासाठी ही याचिका केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासमोरील मार्ग आता संपले आहे.

काबूल एअरपोर्टवर गोळीबाराचा LIVE VIDEO समोर; अमेरिकन सैन्याने रोखल्या बंदुका

दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने समन्स (summons) दिल्यापासून ते ईडी कार्यालयात पोहचले नाही. दिल्लीच्या दौऱ्यानंतर  अनिल देशमुख कुठे आहे याबद्दल कोणाला माहिती नाही. अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरही संपर्क होऊ शकला नाही आहे. अलीकडेच छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर आणि आजूबाजूच्या अनेक ठिकाणी अनिल देशमुखांचा शोध घेण्यााचा प्रयत्न केला. पण त्यांचा ठावठिकाणा कुठे लागला नाही. त्यामुळे अनिल देशमुख लपून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सुवर्णसंधी! पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये तब्बल 395 जागांसाठी मेगाभरती

दरम्यान, अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (money laundering) ईडीने ही कारवाई केली. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केलीय. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.

First published:
top videos

    Tags: Anil deshmukh, NCP