PMC बँक खातेधारकांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली!

PMC बँक खातेधारकांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली!

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खात्यातून पैसे काढण्यावर आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : पीएमसी (PMC Bank) बँक खातेधारकांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयात पीएसमी बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेली याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता पीएमसी खातेधारकांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खात्यातून पैसे काढण्यावर आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. याविरोधात खातेधारकांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण ती याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली असून आता उच्च न्यायालयात जा असा सल्ला देण्यात आला आहे.

धक्कादायक! PMC बँकेचा घोटाळा 6500 कोटींवर, 10.5 कोटींच्या रकमेची नोंदच नाही

पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्यात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेच्या नोंदीत 10.5 कोटींची नोंद नसल्याचं तपास पथकानं म्हटलं आहे. एचडीआयएल आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी दिलेले धनादेश पथकाच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे हे धनादेश कधीच बँकेत जमा न करता रोख रक्कम देण्यात आली. त्याशिवाय हा घोटाळा 4 हजार 355 कोटी रुपयांचा नसून तब्बल 6 हजार 500 कोटींचा असल्याचंही समोर आलं आहे.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याची तपासणी करणाऱ्या पथकाला मिळालेल्या धनादेशांची एकूण किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच अंदाजे 50 लाख रुपयांचा हिशोब नाही. याशिवाय बँकेतील घोटाळ्याची रक्कम 2 हजार कोटींनी वाढली आहे. आता ती 6 हजार 500 कोटी रुपये इतकी झाली आहे.

आरबीआयने नियुक्त केलेले अधिकाऱ्यांच्या आदेशावरून बँकेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. यामध्ये बँकेच्या रेकॉर्डवरून 10.5 कोटी गहाळ झाले असल्याचं दिसत आहे. तसेच तपासणी करत असताना घोटाळ्याची रक्कमही जास्त असल्याचं दिसून आलं.

एडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना धनादेश पाठवले. त्यानंतर थॉमस यांनी धनादेश बँकेत जमा न करताच रोख रक्कम दिली. बँकेच्या रेकॉर्ड बुकमध्येही त्याबाबतची नोंद नाही. थॉमस यांनी 50 ते 55 लाख रुपये स्वत:कडे ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पीएमसी घोटाळ्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये थॉमस यांच्यासह एचडीआयएल आणि त्याचे संचालक राकेश आणि सारंग वर्धवन यांना अटक झाली आहे. दरम्यान, कर्जाच्या घोटाळ्याची रक्कम 4 हजार 355 वरून 6 हजार 500 कोटी रुपयांवर पोहचल्यानं एफआयआरमध्ये अफरातफरीचं कलम जोडलं जाण्याची शक्यता आहे.

न्यायालयानं गुरुवारी पीएमसी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तर मुंबईतील सीएमएम कोर्टानं माजी संचालक एस सुरजित सिंह अरोरा यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बुधवारी अटक केली होती.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 18, 2019, 11:35 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading