Home /News /national /

14 वर्षांची मुलगी झाली आई, बलात्काराच्या आरोपात 84 वर्षीय व्यक्तीची होणार DNA टेस्ट

14 वर्षांची मुलगी झाली आई, बलात्काराच्या आरोपात 84 वर्षीय व्यक्तीची होणार DNA टेस्ट

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला असून या बाळाचे वडील शोधण्यासाठी आरोपीची डीएनए चाचणी घेणे आवश्यक आहे.

    कोलकाता, 19 जुलै : पश्चिम बंगालच्या माटिगारा भागात संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. शनिवारी एका महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या 84 वर्षीय वृद्ध व्यक्तीची डीएनए टेस्ट (DNA Test) करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला असून या बाळाचे वडील शोधण्यासाठी आरोपीची डीएनए चाचणी घेणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेली ही घटना 2012ची आहे. या संपूर्ण प्रकरणातील आरोपी 84 वर्षांचा वृद्ध आहे. ज्याच्यावर 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्कारानंतर मुलीने एका मुलाला जन्म दिला, दरम्यान, या बाळाचे बाबा कोण आहेत, याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची चाचणी करण्यास सांगितले आहे. वाचा-बॉलिवूडला आणखी एक धक्का, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन आरोपीचे वकील कपिल सिब्बल यांनी आरोपीच्या बचावावर युक्तिवाद केला आहे की, या वयस्कर व्यक्तीचे आरोग्य आणि वय पाहता एखाद्या मुलीवर बलात्कार करू शकेल, असे वाटत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून वृद्ध आणि बाळाच्या डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. वाचा-धुळ्यात घडलं थरकाप उडवून देणारं हत्याकांड, गँगवॉरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या यापूर्वी 84 वर्षीय वृद्धाने कोलकाता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, पण हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. ही घटना घडली तेव्हा या वयस्कर व्य़क्तीचे वय 76 वर्षे होते. या खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी वृद्धांच्या डीएनए चाचणीचे आदेश जारी केले आहेत. वाचा-माणुसकीला काळिमा! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: West bengal

    पुढील बातम्या