S M L

खटल्यांच्या वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सुप्रीम कोर्ट

तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. यामध्ये सरन्यायाधीश दिपक मिश्राही होते.

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2018 06:24 PM IST

खटल्यांच्या वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सुप्रीम कोर्ट

 

नव दिल्ली, 11 एप्रिल : सुप्रीम कोर्टात खटल्यांचं न्यायाधीशांकडे वाटप आणि खंडपीठ बनवण्याचा अधिकार हा सरन्यायाधीशांना आहेच, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला.

तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. यामध्ये सरन्यायाधीश दिपक मिश्राही होते. न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड या खंडपीठात होते. सरन्यायाधीशांना हा अधिकार घटनेनंच दिलाय, असं कोर्टानं म्हटलंय. वकील अशोक पांडे यांनी याबाबत याचिका केली होती.

सरन्यायाधीशांनी केसेसचं वाटप करण्याआधी 2 सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींशी सल्लामसलत करावी, अशी मागणी या याचिकेत केली होती. ही याचिका कोर्टानं निकाली काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2018 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close