बोपय्याच हंगामी अध्यक्ष, बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण दाखवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

बोपय्याच हंगामी अध्यक्ष, बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण दाखवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी होऊ द्या. याच थेट प्रक्षेपण करा, यामुळे पारदर्शकता येईल असा दिलासाही कोर्टाने काँग्रेसला दिला.

  • Share this:

कर्नाटक, 19 मे : कर्नाटक विधानसभेत भाजपचे आमदार के.जी. बोपय्या  हेच हंगामी अध्यक्ष राहतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. सुप्रीम कोर्टाने काँग्रेसची याचिका फेटाळून लावलीये.

राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. याविरोधात काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती.

आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. काँग्रेसकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडली. बोपय्यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी वरिष्ठ आमदाराला नियुक्त न करता बोपय्यांना नियुक्त केलं असा युक्तिवाद केला.

यावर सुप्रीम कोर्टाने आम्ही याआधी मध्यरात्री सुनावणी घेतली कारण आम्हाला येडियुरप्पांची बाजू ऐकून घ्यायची होती. पण आता तुम्ही म्हणताय हंगामी अध्यक्ष बदला. पण हे आमच्या अखत्यारीतेत येत नाही. हंगामी अध्यक्ष ठरवणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. आम्ही राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. तसंचही या व्यवस्थेला कायदेशीर अधिकार नाहीये असं स्पष्ट केलं.

बोपय्यांची बाजू ऐकून न घेता नियुक्ती रद्द करू शकत नाही. जर असं झालं तर आज बहुमत चाचणी होऊ शकणार नाही. आम्ही राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

तसंच कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी होऊ द्या. याच थेट प्रक्षेपण करा, यामुळे पारदर्शकता येईल असा दिलासाही कोर्टाने काँग्रेसला दिला.

First published: May 19, 2018, 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading