सवर्ण आरक्षणाला स्थगिती देण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

सवर्ण आरक्षणाला स्थगिती देण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

सवर्ण आरक्षणाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सवर्णांसाठी लागू केलेल्या 10 टक्के आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं. दरम्यान, हे आरक्षण स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा युक्तिवाद केला होता. पण, न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे.

 

राज्यात एकूण आरक्षण 78 टक्क्यांवर

सवर्णांसाठी लागू करण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण आता 78 टक्क्यांवर गेले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना सरकारी, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये तसेच सरकारी आणि निमसरकारी आस्थापना, मंडळे, महामंडळे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरणे यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची डोकदुखी वाढवली, सोलापुरातूनच लढण्याची घोषणा

राज्यात नाही पण केंद्राच्या 10 आरक्षणात मराठा समाजाला संधी

राज्यातील मराठा समाजाचा समावेश ‘एसईबीसी’ राखीव प्रवर्गात केल्याने त्यांना राज्यातील 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. पण केंद्राच्या राखीव प्रवर्गाच्या यादीत त्यांचा समावेश नसल्याने केंद्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा घेता येईल.

सून श्लोकाच्या स्वागतासाठी सासूबाई नीता अंबानींनी केला डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading