Home /News /national /

BIG NEWS : Oxygen Supply साठी सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना, महाराष्ट्रातून कोणाचं नाव?

BIG NEWS : Oxygen Supply साठी सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना, महाराष्ट्रातून कोणाचं नाव?

Supreme court National Task Force सुप्रीम कोर्टाने म्हटलं की राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे टास्क फोर्सची स्थापना करण्याचा उद्देश महामारी दरम्यान नागरितकांच्या आरोग्याची काळजी शास्त्रीय दृष्ट्या आणि खास पद्धतीने घेतली जावी हा आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 08 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या दुसऱ्या लाटेमध्ये वाढत असलेला प्रकोप पाहता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एक राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन केली आहे. या टास्क फोर्सद्वारे संपूर्ण देशामध्ये मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता, उपलब्धता आणि वितरण याच्या आधारावर मुल्यांकनाचे काम केले जाईल. सुप्रीम कोर्टाने या टास्कफोर्सची स्थापना करताना म्हटलं की, राष्ट्रीय स्तरावर या टास्क फोर्सच्या स्थापनेचा उद्देश महामारीदरम्यान नागरिकांच्या आरोग्याची शास्त्रीय आणि एका विशिष्ट पद्धतीनं काळजी घेणं हा आहे. (वाचा-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपसमितीच्या बैठकीत काय ठरलं? अशोक चव्हाण म्हणाले...) या टास्क फोर्समुळं सध्याच्या स्थितीमध्ये समोर असलेल्या समस्यांवर तोडगा काढणारे आणि निर्णय घेणारे यांना महत्त्वाची मदत मिळू शकेल, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. टास्कफोर्स सध्या आणि भविष्यात पारदर्शकपणे आणि व्यावसायिकरित्या महामारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी धोरण आणि त्यासाठी माहिती प्रदान करेल. हे असतील टास्क फोर्सचे 12 सदस्य 1. डॉ. भबतोष विश्वास (माजी कुलपती, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कोलकाता) 2. डॉ. देवेंद्र सिंह राणा (अध्यक्ष, व्यवस्थापकीय मंडळ, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली) 3. डॉ. देवी प्रसाद शेट्टी (अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक, नारायण हेल्थकेअर, बेंगळुरू) 4. डॉ. गगनदीप कांग (प्राध्यापक, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिळनाडू) 5. डॉ. जेवी पीटर (संचालक, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिळनाडू) 6. डॉ. नरेश त्रेहान (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मेदांता हॉस्पिटल आणि हृदय संस्था, गुरुग्राम) 7. डॉ. राहुल पंडित (संचालक, क्रिटिकल केअर मेडिसीन आणि आईसीयू, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, महाराष्ट्र) 8. डॉ. सौमित्र रावत (अध्यक्ष आणि सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि यकृत प्रत्यारोपण विभाग प्रमुख, सर गंगा राम हॉस्पिटल) 9. डॉ. शिव कुमार सरीन (वरिष्ठ प्राध्यापक, हेपेटोलॉजी विभागाचे संचालक, (ILBS),दिल्ली) 10. डॉ. जरीर एफ उदवाडिया ( कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल आणि पारसी हॉस्पिटल, मुंबई) 11. सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण कल्याण मंत्रालय, भारत सरकार 12. नॅशनल टास्क फोर्सचे संयोजक, जो सदस्य असेल ते केंद्रात कॅबिनेट सचिन असतील (वाचा-Corona: भारतासाठी पुढील 20तास अत्यंत महत्त्वाचे? जाणून घ्या व्हायरल मेसेजचं सत्य) यापूर्वी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी केंद्राला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला कोविड-19 च्या रुग्णांच्या उपचारासाठी रोज 700 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सीजन पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील पीठाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यातील तुटवड्याच्या दिल्ली सरकारच्या विनंतीवर विचार केला. रोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आदेश दिला जाईल असं कोर्टानं म्हटलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात अवमान प्रकरणी सुरू केलेली कारवाई स्थगित केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Supreme court

    पुढील बातम्या