सरन्यायाधीश आणि न्यायमूर्तींमधल्या वादावर पडदा, अटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांची मध्यस्थी

सरन्यायाधीश आणि न्यायमूर्तींमधल्या वादावर पडदा, अटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांची मध्यस्थी

सरन्यायाधीश आणि 4 न्यायमूर्तींमधला वाद मिटला, सुप्रीम कोर्ट बार काऊन्सिल अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

  • Share this:

15 जानेवारी : सरन्यायाधीश आणि 4 न्यायमूर्तींमधला वाद मिटला, सुप्रीम कोर्ट बार काऊन्सिल अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आज सकाळी अटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल आणि हे 4 न्यायमूर्ती यांची अनौपचारिक भेट झाली. त्यानंतर मननकुमार मिश्रा यांनी सांगितलं की हा वाद मिटला आहे. हे आपसातले वाद होते.

न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तोडगा काढला जाईल, असंही सांगण्यात आलंय. सुप्रीम कोर्टात पुन्हा सामान्य पद्धतीनं काम सुरू झालंय.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी 12 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या घरासमोर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

काय म्हणाले होते न्यायमूर्ती?

'न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल'

'सुप्रीम कोर्ट प्रशासन योग्य रीतीनं काम करत नाही'

'मुख्य न्यायमूर्तींपुढे प्रश्न मांडले, पण उपयोग नाही'

'गेल्या 2 महिन्यांतील कारभारामुळे आम्ही व्यथित'

'लोकशाहीत न्यायपालिकेला स्वातंत्र्य आवश्यक'

'मजबूत लोकशाहीसाठी न्यायपालिकेची स्वायत्ता महत्वाची'

'मुख्य न्यायमूर्तींना दिलेलं पत्र सार्वजनिक करणार'

First Published: Jan 15, 2018 01:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading