ममता विरुद्ध मोदी- राजीव कुमार यांनी CBI समोर हजर व्हावे: सर्वोच्च न्यायालय

ममता विरुद्ध मोदी- राजीव कुमार यांनी CBI समोर हजर व्हावे: सर्वोच्च न्यायालय

  • Share this:

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: शारदा चिटफंड घोटाळ्या प्रकरणी मोदी सरकार विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. कोलकाता शहर पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय समोर हजर होण्यात काय अडचण आहे, असा सवाल करत न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना काहीचा सेटबॅक दिला आहे. पण त्याचवेळी त्यांना अटक करता येणार नाही असे सांगत दिलासा देखील दिला आहे.

अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी डीजीपी, मुख्य सचिव आणि राजीव कुमार यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी राजीव कुमार यांनी असहकार्य करण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले. त्यांनी कुमार यांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले. त्यावर पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणाऱ्या अभिषेख मनु सिंघवी यांनी सीबीआयला कुमार यांना अटक करायची असल्याचे कोर्टात सांगितले. यावर न्या.गोगोई यांनी कुमार यांना अटक करता येणार नाही असे स्पष्ट केले.

काय म्हणाले कोर्ट

-राजीव कुमार यांना अटक करता येणार नाही

-कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही

-कुमार यांनी सीबीआयला चौकशीसाठी उपलब्ध व्हावे

संबंधित बातमी: 'या' कायद्यामुळे ममता भारी पडत आहेत मोदींवर

First published: February 5, 2019, 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading