अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ अटक होणार नाही -सुप्रीम कोर्ट

अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ अटक होणार नाही -सुप्रीम कोर्ट

तसंच कोर्टाने अटकेपूर्व जामीन अर्ज न मिळण्याची तरतूदही रद्द केली आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आता तुम्हाला जामीन मिळणार आहे.

  • Share this:

20 मार्च : कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एससी आणि एसटी कायद्यांमध्ये मोठे बदल केले आहे. आता या पुढे एससी-एसटी कायद्याअंतर्गत प्रकरणात कुणालाही तत्काळ अटक करता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय.

एकीकडे देशभरात झुंडशाहीची प्रकरणं डोकं वर काढत आहे तर दुसरीकडे ग्रामीण आणि दुर्गम भागात अजूनही दलितांवर होणारे हल्ले कमी झालेले नाही. वारंवार अशा घटना घडतच आहे. मात्र, या अशा प्रकरणात कायदाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

अशा प्रकरणाची दखल घेत सुप्रीम कोर्टाने एससी आणि एसटी कायद्यांमध्ये बदल केले आहे. न्यायमूर्ती आदर्श गोयल आणि न्यायमूर्ती यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने लोकप्रतिनिधींच्या विरोधात एससी आणि एसटी कायद्याअंतर्गत प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास कोणतेही प्रतिबंध नाही असं खंडपीठाने नमूद केलं.

तसंच या कायद्याच्या अंतर्गत अटकेपूर्वी प्राथमिक चौकशी करण्यात यावी असे आदेशही कोर्टाने पोलिसांना दिली आहे. तसंच कोर्टाने अटकेपूर्व जामीन अर्ज न मिळण्याची तरतूदही रद्द केली आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास आता तुम्हाला जामीन मिळणार आहे.

First published: March 20, 2018, 5:13 PM IST

ताज्या बातम्या