भारतात अधिकारी का नेमला नाही?, सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅपला फटकारलं

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2018 10:56 PM IST

भारतात अधिकारी का नेमला नाही?, सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅपला फटकारलं

नवी दिल्ली. 27 आॅगस्ट : केंद्र सरकारपाठोपाठ सुप्रीम कोर्टानंही व्हॉट्सअॅपला खडसावलं आहे. भारतात अजून तक्रार निवारण अधिकारी का नेमला नाही ?, गुगल आणि फेसबुकनं असे अधिकारी नेमले आहेत, मग तुम्हाला काय अडचण आहे, अशा शब्दात कोर्टानं व्हॉट्सअॅपला फटकारलं आहे.

एका याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टानं ही कानउघाडणी केली. गेल्या काही दिवसांत अफवांना पेव फुटला होता त्यामुळे जमावाकडून निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळे सरकारने कठोर पाऊल उचलली.

गेल्या आठवड्यातच व्हॉट्सअॅपचे सीईओ क्रिस डेनियल भारतात आले होते. माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना भेटल्यावर, प्रसाद यांनीही तक्रार निवारण अधिकारी नेमा, अशी सूचना दिली होती. पण व्हाॅट्सअॅपने असा कोणताही निर्णय घेतला नाही.

रविशंकर प्रसाद यांच्या सुचना

1) भारतातील यूझर्स आपली तक्रार करू शकतील यासाठी एक प्रणाली तयार करा आणि एक पूर्ण व्यवस्था यासाठी तयार करा

2) तुम्हाला भारतीय कायद्याचे पालन करावे लागेल.

आम्ही कधीच खपवून घेणार नाही जी घटना भारतात घडलीये आणि तिच्याबद्दल अमेरिकेत विचारावे लागेल.

3) व्हाॅट्सअॅप भारतात डिजीटल जगात एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यासाठी यात व्यावहारीकता आली पाहिजे.

आम्ही तुमच्या सुचनाचं पालन करून आणि यावर लवकरच फेक न्यूज रोखण्यासाठी व्यवस्था स्थापन करू असं आश्वासन डेनियल यांनी रविशंकर प्रसाद यांना दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 10:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close