शाहीन बाग आंदोलन मागे घेणार? सुप्रीम कोर्टाने मध्यस्तीसाठी केली वकिलाची नियुक्ती

शाहीन बाग आंदोलन मागे घेणार? सुप्रीम कोर्टाने मध्यस्तीसाठी केली वकिलाची नियुक्ती

आंदोलन करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असलं तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. कुणी कुठेही आंदोलन करू शकत नाही. त्यासाठी रस्ता अडवला जावू शकत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी : CAA आणि NRC विरोधात राजधानी दिल्लीत गेल्या 58 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन बंद व्हावं यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकांवर आज सुनावणी झाली. आंदोलन करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असलं तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. कुणी कुठेही आंदोलन करू शकत नाही. त्यासाठी रस्ता अडवला जावू शकत नाही. आंदोलनासाठी ठरवलेल्या जागेवरच हे आंदोलन झालं पाहिजे असंही सुप्रीम कोर्टाने आज सुनावलं. आंदोलकांशी चर्चा करून मन वळविण्यासाठी कोर्टाने ज्येष्ठ वकिल संजय हेगडे यांची नियुक्ती केली आहे. दुसऱ्या पक्षाचं मत विचारात घेतल्याशीवाय कुठलाही निर्णय देता येणार नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे.

CAA आणि NRC विरोधात मुस्लिम संघटनांनी हे आंदोलन सुरु केलंय. शाहीन बागच्या परिसरात हे आंदोलनं सुरु आहे. मुस्लिम महिला मोठ्या संख्येने या परिसरात आंदोलनाला बसल्या आहेत. त्यामुळे मुख्य रस्ता ब्लॉक झाला असून वाहतूक वळविण्यात आलीय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जॅमचा सामना करावा लागतोय. त्यामुळे कोर्टात या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकार शाहीन बाग आंदोलकांशी चर्चेला तयार असल्याचं म्हटलं आहे. ते पाटण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आमची चर्चेची कायम तयारी राहिली आहे. मात्र आंदोलक पुढे येत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एका वाहिनीशी बोलताना आपण CAA आणि NRCवर कुणाशीही चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.

First published: February 17, 2020, 3:06 PM IST

ताज्या बातम्या