नवी दिल्ली, 20 जानेवारी : निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषी झालेल्या चार दोषींपैकी पवन गुप्ता याच्यावतीने अल्पवयीन असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पवन गुप्ताकडून दावा करण्यात आला होता की, 16 डिसेंबर 2012 रोजी तो अल्पवयीन होता. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. न्यायाधीश आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने ही याचिका फेटाळून लावत, हीच बाब कितीवेळा पुढे आणणार आहात? अल्पवयीन असल्याचं ट्रायल कोर्टात का सांगितलं नाही असे प्रश्न विचारले. दोषी पवन गुप्ताच्यावतीने यासंदर्भात दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळली गेली होती.
पवन गुप्ताने याचिकेत दावा केला आहे की, 16 डिसेंबर 2012 रोजी तो अल्पवयीन होता, म्हणून त्याला फाशी होऊ शकत नाही. पवन म्हणाला की, दिल्ली उच्च न्यायालयाने या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने पवनचा वकील ए.पी. सिंगला पवन अल्पवयीन असल्याची विनंती फेटाळून लावत 25,000 रुपये दंड ठोठावला होता. दोषी पवनची याचिका सुप्रीम कोर्टाकडूनही फेटाळली गेली तर त्याला निवारक याचिका आणि दया याचिका राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा पर्याय असणार आहे.
विशेष म्हणजे निर्भया प्रकरणातील आणखी एक आरोपी मुकेश सिंग यांची दया याचिका राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी यापूर्वीच फेटाळली आहे. खरंतर, क्यूरेटिव पिटिशन फेटाळल्यानंतर मुकेशने राष्ट्रपतींकडे दया दाखल केली. आता त्याच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही.
इतर बातम्या - जेपी नड्डा असतील नवे BJP अध्यक्ष, आजपासून घेणार अमित शहांची जागा
दोषींवर कोणते पर्याय शिल्लक आहेत
मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडून फेटाळल्यानंतर त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. अक्षय आणि पवन या दोन दोषींना अजूनही क्यूरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. अक्षय, पवन आणि विनयकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा घटनात्मक पर्याय आहे.
1 फेब्रुवारी रोजी दोषींना होईल फाशी
निर्भया प्रकरणातील चार दोषी - मुकेश, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ताला 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. चौघांना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळली असल्याची माहिती तिहार जेल अधिकाऱ्यांनी पटियाला हाऊस कोर्टात दिली होती. यानंतर कोर्टाने नवीन डेथ वॉरंट जारी केले होते.
इतर बातम्या - रोहित शर्माने सुसाट केल्या 9000 धावा, विराट कोहलीला 'हाय अलर्ट'!
सर्व दोषींना तिहार कारागृह क्रमांक 3मध्ये हलवण्यात आले
निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींना दिल्लीतील तिहार जेल क्रमांक 3मध्ये हलवण्यात आले आहे. दररोज चार दोषींच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. चौघांना 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा पाळत ठेवण्यात आले आहे. तुरूंगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही चारही दोषींना तुरूंगातील तीन क्रमांकावर बदली केली आहे, जिथे त्यांना फाशी देण्यात येईल." विनय शर्माला तिहार तुरूंगातील चार क्रमांकावर आणि मुकेश आणि पवनला तुरूंगातील क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आले आहे.