कर्नल पुरोहितांना सु्प्रीम कोर्टाचा दिलासा

कर्नल पुरोहितांना सु्प्रीम  कोर्टाचा दिलासा

आरोपांना आव्हान देण्यासाठी मुंबई हायकोर्टात खटला सुरू होण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलय. Unlawful activities prevention act या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याविरोधात ते आताही अपील करू शकतात, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

  • Share this:

20 एप्रिल:  कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. एनआयए कोर्टात मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप निश्चितीचा खटला सुरु होण्यापूर्वी UAPA अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोपांना पुरोहित यांना आव्हान देता येईल. य़ाची परवानगीच  आता सुप्रीम कोर्टाने त्यांना दिली आहे.

आरोपांना आव्हान देण्यासाठी  मुंबई हायकोर्टात खटला सुरू होण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलय. Unlawful activities prevention act या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याविरोधात ते आताही अपील करू शकतात, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. 2008 साली  मालेगावात  बॉम्बस्फोट  झाला होता. याप्रकरणी त्यांच्यालर   युएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आरोपांना  हायकोर्टात  खटला सुरू होईपर्यंत  ते आव्हान देऊ शकत नव्हते. कर्नल पुरोहितांनी यासाठीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यूएपीएचे आरोप हटवण्याची मागणी करणारी याचिका मांडली होती.  आता  अशी अपील ते करणार असून त्यांचा खटला हरीश साळवे लढवणार आहेत

मालेगाव २००८ बाॅम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहीतची सुप्रीम कोर्टात धाव, UAPA चे आरोप हटवण्याची याचिकेत मागणी, आज सुनावणी होणार. ज्येष्ठ वकील हरिश साळवे पुरोहीतची बाजू मांडणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 05:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading