राफेलविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, मोदी सरकारला दिलासा

राफेलविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, मोदी सरकारला दिलासा

राफेल कराराची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, यासाठी अॅड. विनीत ढांडा यांनी याचिका दाखल केली होती. तसंच सरकारवर विविध आरोप करत या कराराविरोधात इतरही काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : राफेल खरेदीवर संशय घेणं चुकीचं आहे, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राफेल कराराबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेलवरून सरकारला संशयाच्या भोवऱ्यात उभं करणाऱ्या विरोधकांना हा मोठा झटका आहे.

काय होता आरोप?

राफेल कराराची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, यासाठी अॅड. विनीत ढांडा यांनी याचिका दाखल केली होती. तसंच सरकारवर विविध आरोप करत या कराराविरोधात इतरही काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

राफेल करारातील कथित अनियमिततेसाठी सीबीआयला FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकांद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे आज राफेल प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात सरकारची मोठी परीक्षा आहे, असं म्हटलं जात होतं.

काय आहे राफेल प्रकरण?

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी किंपनी 'एचएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.

राफेलच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. तसंच या मुद्द्यावरून राहुल यांनी राफेल विमान बनवणाऱ्या ‘दसॉ’ या कंपनीवरही आरोप केले होते.

VIDEO : शेतकऱ्यांचा संताप, मोदींनंतर आता फडणवीसांना 310 रुपयांची मनीऑर्डर

First published: December 14, 2018, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading