अशांतता निर्माण करण्यासाठी याचिका, सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांना फटकारले

अशांतता निर्माण करण्यासाठी याचिका, सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांना फटकारले

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी शंका घेणाऱ्या विरोधी पक्षांना दुहेरी झटका बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी शंका घेणाऱ्या विरोधी पक्षांना दुहेरी झटका बसला आहे. सर्व ठिकाणी ईव्हीएमला व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणारी विरोधकांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या याचिकांवर वारंवार सुनावणी करणार नसल्याचे देखील स्पष्ट केले. विशेष म्हणजे या संदर्भात आजच बैठक होणार आहे. या बैठकीच्या आधी त्यांनी न्यायालयाकडून दणका बसला आहे.

एका बाजूला न्यायालयाने दणका दिला असताना दुसऱ्या बाजूला ईव्हीएम संदर्भात आयोगाकडे केलेली तक्रार देखील फेटाळून लावण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएम सुरक्षित नसल्याची तक्रार विरोधकांनी केली होती. यावर आयोगाने सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचे सांगत विश्वास ठेवा असे म्हटले आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उमेदवारांच्या समोर व्हिडिओ शूट करून सील करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेसंदर्भात काळजी करण्याचे कारण नाही. विरोधकांनी उत्तर प्रदेशमधील गाझीपूर, चंदौली, डुमरियागंज आणि झाशी या मतदारसंघातील ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर मुख्य निवडणूक आयु्क्तांनी सर्व राजकीय पक्षांना सांगितले की, ईव्हीएम सुरक्षित आहेत आणि आयोगावर विश्वास ठेवा.

फक्त चर्चा करण्यासाठी आणि अशांतता निर्माण करण्यासाठी याचिका

सर्व ईव्हीएमला 100 व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणाची याचिकाची सुनावणी करताना आयोगाने याचिकाकर्त्यांना फटकारले. कोर्टाने अशा प्रकारची याचिका म्हणजे उपद्रव आणि चर्चासाठी वापरले जाणारे साधन असल्याचे म्हटले आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी अशा प्रकारच्या याचिकेवर वारंवार सुनावणी करणार नसल्याचे सांगितले.

VIDEO: 'वंचित फॅक्टर'मुळे मतं फुटणार, काँग्रेसनं केलं मान्य

First published: May 21, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading