सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाबाबतची याचिका काँग्रेसनं घेतली मागे

सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाबाबतची याचिका काँग्रेसनं घेतली मागे

रन्यायाधीशांच्या महाभियोबाबत उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधातली याचिका काँग्रेसनं मागे घेतली आहे. वकील कपिल सिबल यांनी आपण याचिका मागे घेत आहोत, असं घटनापीठापुढे सांगितलं.

  • Share this:

08 मे : सरन्यायाधीशांच्या महाभियोबाबत उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधातली याचिका काँग्रेसनं मागे घेतली आहे. वकील कपिल सिबल यांनी आपण याचिका मागे घेत आहोत, असं घटनापीठापुढे सांगितलं. पण या आधी सिब्बल यांनी घटनापीठाशी हुज्जत घातली.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळल्याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, काँग्रेसने ही याचिका आज अचानक मागे घेतली.

पण दरम्यान, या याचिकेवर घटनापीठ बनवण्याच्या आदेशाची ऑर्डर आम्हाला दाखवा, अशी अजह मागणी सिब्बल यांनी केली. ही ऑर्डर दाखवण्यास कोर्टानं साफ नकार दिला. सिब्बल यांची मागणी अभूतपूर्व आहे, तुम्हाला ऑर्डर बघण्याची गरजच काय, असं घटनापीठानं म्हटलं आहे.

 

 

First published: May 8, 2018, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading