Babri Case : अयोध्येत राम मंदिर होणारच; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या सगळ्या फेरविचार याचिका

Babri Case : अयोध्येत राम मंदिर होणारच; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या सगळ्या फेरविचार याचिका

वादग्रस्त रामजन्मभूमीची जागा रामलल्लाची असल्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं. या निर्णयाचा फेरविचार व्हावा या अर्थाच्या एकूण 18 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने फेटाळल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर : सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमीच्या वादावर 9 नोव्हेंबरला निर्णय दिला होता. या निर्णयावर फेरविचार व्हावा म्हणून काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी कशी घ्यायची याचा निर्णय खंडपीठाने घेतला आणि सर्व फेरविचार याचिका फेटाळल्या.

वादग्रस्त रामजन्मभूमीची जागा रामलल्लाची असल्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं. या निर्णयाचा फेरविचार व्हावा या अर्थाच्या एकूण 18 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर गुरुवारी दुपारी सरन्यायाधीशांसह  पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने चेंबरमध्ये सुनावणी घेतली. चीफ जस्टिस शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या या खंडपीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. एस अब्दुल नजीर आणि न्या संजीव खन्ना यांनी सुनावणी घेतली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या