1 एप्रिलपासून BS 4 वाहनांची विक्री बंद, यापुढे धावतील फक्त BS - 6 वाहनं

1 एप्रिलपासून BS 4 वाहनांची विक्री बंद, यापुढे धावतील फक्त BS - 6 वाहनं

भारतात 1 एप्रिलपासून BS - 4 वाहनांची विक्री बंद होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या वाहनांच्या विक्रीसाठीची मुदत वाढवण्याला नकार दिलाय. त्यामुळे आता फक्त BS - 6 वाहनांचीच विक्री केली जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : भारतात 1 एप्रिलपासून BS - 4 वाहनांची विक्री बंद होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या वाहनांच्या विक्रीसाठीची मुदत वाढवण्याला नकार दिलाय. त्यामुळे आता फक्त BS - 6 वाहनांचीच विक्री केली जाईल. त्यामुळे वाहनाची खरेदी करताना तुम्ही तुमचं वाहन BS - 4 तर नाही ना याची खात्री करून घ्या.

काय आहेत BS नियम?

भारतात 2000 साली वाहनांसाठी इमिशन स्टँडर्ड ठरवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या निकषांनुसार हवेचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हे नियम ठरवण्यात आले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने यासाठी काही स्टँडर्ड ठरवले आहेत.

BS3, BS4 आणि BS6

BS चा संबंध इमिशन स्टँडर्डशी आहे. BS म्हणजे भारत स्टेज. यावरून तुमची गाडी किती प्रदूषण करते यावर BS अवलंबून असतं. यामध्ये जो नंबर असतो त्यावरून त्या वाहनामुळे किती प्रदूषण होण्याची शक्यता असते याचा अंदाज येतो. त्यावरूनच BS3, BS4 और BS6 हे स्टँडर्ड ठरवले जातात.

(हेही वाचा : जगातल्या या सगळ्यात श्रीमंत माणसाने गर्लफ्रेंडला दिलं 1200 कोटींचं गिफ्ट)

BS6 चे फायदे

BS-6 लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल कार्समध्ये फारसा फरक उरणार नाही. डिझेल कारमुळे 68 टक्के आणि पेट्रोल कारमुळे 25 टक्क्यांपर्यंत नायट्रोजन ऑक्साइडचं उत्सर्जन कमी होईल. त्याचबरोबर डिझेल कारचं उत्सर्जन 80 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ यामुळे हवेचं प्रदूषण कमी करण्याचं आव्हान खूप मोठं आहे. या पार्श्वभूमीवर, हवेचा दर्जा वाढवण्यासाठी BS - 4 वाहनांची विक्री बंद करण्याचा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

(हेही वाचा : या तीन बँकांमध्ये खाती असतील तर आता भरावा लागणार कमी EMI, आजपासून नवा दर लागू)

============================================================================================

First published: February 14, 2020, 3:39 PM IST

ताज्या बातम्या