राम मंदिर : 1 टक्का तोडग्याची शक्यता असेल तरी प्रयत्न करा - सुप्रीम कोर्ट

राम मंदिर : 1 टक्का तोडग्याची शक्यता असेल तरी प्रयत्न करा - सुप्रीम कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला या तिघांमध्ये या वादग्रस्त जागेचं समान वाटप करण्यात यावं, असा निकाल अलाहाबाद हायकोर्टाने २०१० साली दिला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : राम मंदिराच्या वादावर तोडगा निघण्याची एक टक्का जरी शक्यता असेल तर त्यासाठी सामोपचाराने प्रयत्न करायला हवेत,  असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. राम मंदिराच्या वादाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये १४ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावरच्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे म्हटलं आहे.


सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला या तिघांमध्ये या वादग्रस्त जागेचं समान वाटप करण्यात यावं, असा निकाल अलाहाबाद हायकोर्टाने २०१० साली दिला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या १४ याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या.


अयोध्येमधली ही जागा २.७७ एकर एवढी आहे. या वादावर सामोपचाराने तोडगा निघत असेल तर त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, आम्ही याचा गांभिर्याने विचार करत आहोत आणि ही पूर्ण प्रक्रिया गुप्त ठेवण्यात येईल, असंही कोर्टाने सूचित केलं आहे.


सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. ए.ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच जणांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Ram Mandir
First Published: Feb 26, 2019 12:45 PM IST

ताज्या बातम्या