अयोध्या प्रकरणात नवं खंडपीठ स्थापन करणार, पुढील सुनावणी 29 जानेवारीला

जस्टिस रंजन गोगई, जस्टिस एस.ए बोबडे एन.वी रमन्ना, यूयू ललित आणि डीवाई चंद्रचुड यांचा समावेश आहे. 10 जानेवारीपासून हे खंडपीठ या प्रकरणाची नियमित सुनावणी करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 11:07 AM IST

अयोध्या प्रकरणात नवं खंडपीठ स्थापन करणार, पुढील सुनावणी 29 जानेवारीला

 नवी दिल्ली, 10 जानेवारी : अयोध्या प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. खंडपीठातील यूयू ललित यांच्यावर आक्षेप घेतल्यामुळे ललित यांनी खंडपीठातून आपलं नाव काढून घेतलं. त्यामुळे आता या प्रकरणी नवं खंडपीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी 29 जानेवारीला करण्यात येईल.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय खंडपीठ तयार करण्यात आले होते. यात जस्टिस रंजन गोगई, जस्टिस एस.ए बोबडे, एन.वी रमन्ना, यूयू ललित आणि डीवाई चंद्रचुड यांचा समावेश होता. मात्र यूयू ललित यांनी काढता पाय घेतल्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा पुढची तारीख मिळाली आहे.

याआधी 4 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात पहिली सुनावणी झाली होती. ही सुनावणी केवळ 60 सेंकदात संपवत नियमित सुनावणी 10 जानेवारीपासून सुरू होणार असं कोर्टानं सांगितलं होतं.

"अयोध्येत लवकरच राम मंदिर उभारणीला सुरुवात होणार"

अयोध्येत लवकरच राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होईल असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरासंदर्भात जे वक्तव्य केले आहे ते सकारात्मकच आहे असेही भागवत म्हणाले. नागपूरात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर होणार नाही असे कुठले म्हंटले नाही फक्त न्यायालयीन प्रक्रियेनंतर होईल असे ते म्हणाले असेही भागवत यांनी सांगितलं.

आम्हाला राम मंदिर हवेच आहे राम मंदीरासाठी सरकारने संसदेत विधेयक आणून कायदा करावा किंवा राष्ट्रपतींद्वारे अध्यादेश काढून राम मंदीराचे निर्माण कार्य सुरु करावं असं मतही भागवत यांनी व्यक्त केलं.

राम मंदिरावर काय म्हणाले होते मोदी?

राम मंदिराचा प्रश्न काँग्रेसमुळेच रखडला आहे. काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी वकिलपत्र घेतलीत त्यांनीच त्यात अडथळे आणलेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत केला होता. हा प्रश्न लवकर निकाली निघावा असं वाटत असेल तर काँग्रेसने आपल्या नेत्यांना सांगितलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : या वाईट सवयीमुळे राकेश रोशन यांना झाला घशाचा कॅन्सर

राम मंदिरावर आणखी काय म्हणाले मोदी?

राम मंदिराचा निर्णय हा राज्य घटनेच्या चौकटीत राहुनच घेतला जाईल. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा राम मंदिराबाबत हेच सांगितलं होतं. गेली 70 वर्ष सरकारमध्ये बसलेल्या लोकांनीच या प्रकरणात अडथळा आणला. आजही हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.

काँग्रेसच्या नेत्यांना विनंती करतो की, देशातील शांती, सामाजिक सलोखा टिकावा यासाठी काँग्रेसने आपल्या वकिलांना या प्रकरणात कोणताही प्रकाराच अडथळा आणून नये असं सांगावं.

कोर्टात काँग्रेसच्या वकिलांचा अडथळा जर बंद झाला पाहिजे. कोर्टाची प्रक्रियाही त्यांच्या नियमाप्रमाणे सुरू राहिली पाहिजे. त्याला राजकीय चषम्यातून पाहू नये. हे प्रकरण कोर्टात आहे, कोर्टात या प्रकरणाचा निकाल लागेल. त्यानंतर सरकारची जबाबदारी जिथे सुरू होते, तिथे आमचे पूर्ण प्रयत्न राहतील.


VIDEO : मोदींनी 'चौकीदार'ला बनवलं शस्त्र, पंतप्रधानांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 15 मुद्दे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...