Home /News /national /

मोठी बातमी! लॉकडाऊनमध्ये एअरलाइन्सचं तिकीट बुक केलं होतं? आता मिळणार रिफंड

मोठी बातमी! लॉकडाऊनमध्ये एअरलाइन्सचं तिकीट बुक केलं होतं? आता मिळणार रिफंड

लॉकडाऊनमध्ये एअरलाइन्सचं तिकीट बुक केलं होतंत तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

    नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : कोरोनामुळे देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व ट्रेन, विमान वाहतुक बंद करण्यात आली. दरम्यान या कालावधीत काहींनी एअरलाइन्सचे तिकीट बुक केले होते. त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानं डीजीसीएद्वारा क्रेडिट शेलच्या माध्यमातून लॉकडाऊन कालावधीत एअरलाइन्सचे तिकीट काढलेल्या सर्व प्रवाशांना पैसे परत देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर 25 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यावेळी बाहेरच्या देशातून भारतात परतलेल्या लोकांमुळे कोरोनाचे संक्रमण अधिक होत्याचे लक्षात येताच क्रेंद्र सरकारनं सर्व विमान उड्डाणे बंद केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केल्यामुळे याचा फटका ग्राहकांना आणि एअरलाइन्स कंपन्यांना बसला. मात्र आता लॉकडाऊन कालावधीत एअरलाइन्सचे तिकीट काढलेल्या रिफंड देण्याच्या प्रस्तावावर सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय दिला आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. असा घ्या या रिफंड योजनेचा फायदा ही योजनेअंतर्गत ग्राहक 31 मार्च 2021 पर्यंत आपल्या तिकीटाच्या पैशांएवजी विमानाचे दुसरे तिकिट खदेरी करू शकतात. जर ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत दुसरे तिकिट खरेदी केले नाही तर एअरलाइन्स ग्राहकांना पैसे परत देईल. ज्या ग्राहकांची एजंटच्या माध्यमातून तिकिटं खरेदी केली आहे, त्यांचे पैसे एजंटच्या खात्यात जमा होतील.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या