Home /News /national /

कोर्टाचं मन द्रवलं, 90 वर्षीय आजारी आईला मिळाली तुरुंगातील मुलाशी बोलण्याची परवानगी

कोर्टाचं मन द्रवलं, 90 वर्षीय आजारी आईला मिळाली तुरुंगातील मुलाशी बोलण्याची परवानगी

तुरुंगातल्या कैद्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना भेटणं खूप अवघड होऊन बसतं. इथं मात्र कोर्टानं मानवीय भावनांना लक्षात घेऊन निर्णय दिला आहे.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : न्यायव्यवस्था ही नेहमीच भावनेला स्थान न देता केवळ बुद्धी आणि तर्कांच्या आधारवर न्यायदान करताना आपण पाहतो. मात्र एक मानवी भावनेला लक्षात घेत निकाल देण्याचा एक प्रसंग शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये (supreme court) घडला. हाथरस बलात्कार प्रकरणामध्ये (rape case) बातमी करण्यास जाताना केरळचे पत्रकार (journalist from Kerala) पत्रकार सिद्दीक कप्पन यांना उत्तर प्रदेशात अटक केली गेली होती. याप्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी झाली. न्यायालयात कप्पन यांच्या नव्वदवर्षीय आजारी आईनं (sick mother) अपील केली होती, की तिला आपल्या मुलाला पाहण्याची इच्छा आहे. तिच्याशी बोलण्याची इच्छा आहे. यावर चीफ जस्टीस (chief justice) शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील बेंचनं मानवीय भावनांना लक्षात घेत एक आदेश काढला. या आदेशामध्ये सांगितलं गेलं, की आई-आणि मुलाची भेट घडवली जावी. आदेशात सांगितल्यानुसार व्हिडीओ-कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही भेट घडवली जाणार आहे. हे ही वाचा-कपडे नसेल पण सोनं घालणार, चिंकू पठाण आता झोपतोय NCB च्या कोठडीत फर्शीवर! न्यायालयाच्या आदेशावरून उत्तर प्रदेश सरकारकडून (UP government) नियुक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कप्पन यांच्या आईला मुलाची लवकरात लवकर भेट घडवून देण्यात येईल असं आश्वासन दिलं. कप्पनच्या आईच्या बाजूनं बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी मुद्दा मांडला, की ही वयोवृद्ध महिला अंथरुणाला खिळून आहे. तिला आपल्या मुलाशी संवाद करायचा आहे. यावर खालच्या न्यायालयात अर्ज दिला गेला होता. पण तिथं तो फेटाळण्यात आला. तुरुंगाचे नियम व्हीडिओ कॉन्फरन्सिंग आणि संवादाची परवानगी देत नाहीत असं तिथं सांगितलं गेलं होतं. कप्पन 5 ऑक्टोबरला युपीच्या हाथरस इथं जात होते तेव्हा त्यांना पोलिसांच्या पथकानं अटक केला. कप्पन यांची सुटका करावी यासाठी केरल युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्टनं एक याचिकासुद्धा सुप्रीम कोर्टात केलेली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kerala, Supreme court

    पुढील बातम्या