सुप्रिया सुळेंना विरोधी पक्षनेतेपद मिळणार? दिल्लीत हालचालींना वेग

सुप्रिया सुळेंना विरोधी पक्षनेतेपद मिळणार? दिल्लीत हालचालींना वेग

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेते पदही मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत या भेटीत चर्चा होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेते पदही मिळेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेटही झाली. या भेटीतून दोन पक्षांच्या विलीनीकरणाचे संकेत मिळाल्यास देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते, असं मत राजकीय राजकारणांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादी हा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील. असं झाल्यास सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडू शकते.


शरद पवार यांनी विरोध पक्षनेतेपत मिळावं यासंदर्भात राहुल गांधींशी चर्चा केल्याचं बोललं जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना हे महत्त्वाचं पद मिळावं अशी इच्छा पवारांनी व्यक्त केल्याचं समजतं. तसं झालं तर ही मोठी घटना ठरेल. 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या परदेशी मूळाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतहर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.


VIDEO: मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी 'या' मंत्र्याने धरले मुलीचे पाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या