पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी येणार सुपर हायटेक विमान, 1400 कोटी केले खर्च!

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी येणार सुपर हायटेक विमान, 1400 कोटी केले खर्च!

या विमानात क्षेपणास्त्रांची चेतावणी देणारी यंत्रणा असणार आहे. जी क्षेपणास्त्रांवर गोळीबार करण्यास सक्षम आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,  04 जून : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असणार्‍या विमान्यात आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणाऱ्या  विमानांप्रमाणे सुरक्षित असणार आहे. येत्या सप्टेंबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'एअर इंडिया वन' च्या ताफ्यात दोन खास अपग्रेड केलेल्या बोईंग -777 विमानांमध्ये 'सेल्फ प्रोटेक्शन सूट' (एसपीएस) सज्ज असतील.

या विमानात इन्फ्रारेड आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या विमानात क्षेपणास्त्रांची चेतावणी देणारी यंत्रणा असणार आहे. जी क्षेपणास्त्रांवर गोळीबार करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर,या विमानात शत्रूच्या रडार यंत्रणेला बाधा आणण्यास सक्षम तंत्रज्ञानासह सुसज्ज देखील असणार आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअरफोर्स वनमध्ये या विमानांचे सुरक्षा उपाय देखील या विमानात असणार आहे. एअर इंडियाने व्हीव्हीआयपी प्रवासासाठी नवीन बोईंग - 777 -300  ईआर विमानांची एक जोडी डलास  येथील अमेरिकेतील बोईंग सुविधा केंद्रात पाठविली होती. जिथे त्यांना क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा बसविण्यात येईल. यासाठी जवळपास सुमारे  1400 कोटी खर्च लागणार आहे.

हेही वाचा -राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांबद्दल मोठा निर्णय; मंत्र्यांनी दिली माहिती

विमानाच्या रेकॉर्डवरून असे दिसून आले आहे की, 'दोन्ही विमाने तीन वर्षांपेक्षा कमी जुने होती आणि क्वचितच वापरली गेली आहेत. या नवीन एअर इंडिया वन विमानात ऑफिसची जागा, मीटिंग रूम आणि कम्युनिकेशन सिस्टम असणार आहे. शिवाय या विमानात इंधन न भरता भारत आणि अमेरिकेदरम्यान उड्डाण करण्याची सुविधाही असेल, अशी माहिती मिळाली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. व्हीव्हीआयपी लोकांवर नेहमीच धोका होण्याची शक्यता असते. एखाद्या देशाने आपल्या वरिष्ठ नेतृत्त्वाचे रक्षण करण्यासाठी जे काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्याचाच भाग म्हणून हे विमान तयार करण्यात येत आहे.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एअर इंडियाचे बोईंग बी - 747 हे  विमान वापरतात. ते जवळपास 20 वर्ष जुने आहेत . राष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान जवळपास 26 वर्षे सेवेत आहेत.

First Published: Jun 4, 2020 05:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading