S M L

ग्वालियर स्टेशनजवळ 'बर्निंग ट्रेन', दोन डबे जळून खाक

दिल्लीहुन विशाखापट्टनमला जाणारी आंध्र प्रदेश एक्स्प्रेसला ग्वालियर स्टेशनजवळ भीषण आग लागली.

Sachin Salve | Updated On: May 21, 2018 02:39 PM IST

ग्वालियर स्टेशनजवळ 'बर्निंग ट्रेन', दोन डबे जळून खाक

नवी दिल्ली, 21 मे : दिल्लीहुन विशाखापट्टनमला जाणारी आंध्र प्रदेश एक्स्प्रेसला ग्वालियर स्टेशनजवळ भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश एक्स्प्रेस ग्वालियर स्टेशनजवळ ब्रिलानगर स्टेशनवर उभी होती. तेव्ही रेल्वेच्या एका एसी कोचमधून अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुपधोरण करत रेल्वेचे चार डबे आगीत भस्मसात झाले. आगीच्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. सुदैवाने रेल्वेही स्टेशनवर उभी होती त्यामुळे प्रवाशांनी तातडीने रेल्वेखाली केली.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्यात आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या आगीत एक्स्प्रेसचे दोन डबे जळून खाक झाले. या प्रवाशांच्या सामानाचेही नुकसान झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close