Super Cyclone Amphan: भयंकर! वाऱ्यामुळं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पाहा थरारक VIDEO

Super Cyclone Amphan: भयंकर! वाऱ्यामुळं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पाहा थरारक VIDEO

अम्फान चक्रीवादळ या दशकातील हे सर्वात भयंकर चक्रीवादळ मानले जात आहे. आता हे वादळ भारतातून बांगलादेशच्या दिशेनं गेलं आहे.

  • Share this:

कोलकाता, 21 मे : देशात कोरोनासोबतच तीन दिवसांपासून अम्फान चक्रीवादळाचं (Super Cyclone Amphan) थैमान सुरू आहे. कोलकाता, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या बुधवारी या चक्रीवादळानं भयंकर रुप धारण केलं. या दशकातील हे सर्वात भयंकर चक्रीवादळ मानले जात आहे. आता हे वादळ भारतातून बांगलादेशच्या दिशेनं गेलं आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या 6 तासात याचा वेग कमी होऊन 30 किमी प्रतितास होईल. दरम्यान, बुधवारी याचा वेग 190 किमी होता. या वादळामुळं 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वादळ येण्यापूर्वी ओडिशातील जवळपास 58 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हावडा आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यात वादळामुळे झाड अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.

वाचा-'Amphan' चं प. बंगाल-ओडिशामध्ये थैमान, कोट्यवधीचं नुकसान तर 12 जणांचा मृत्यू

वाचा-Amphan Cyclone : वादळात उडाली शेड आणि बराच वेळ उडत राहिल्या ठिणग्या, पाहा VIDEO

पश्चिम बंगालमधील बर्‍याच जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. हे वादळ इतके धोकादायक होते की रस्त्यावर उभे असलेले ट्रक पलटी झाले आहेत. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी या विध्वंसचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जगदीप यांनी, 'लोकांचा मृत्यू आणि जीवित हानी झाल्यामुळं मी दु: खी आहे. गेल्या काही दिवसांत सर्व एजन्सींच्या संपर्कात होते. एजन्सींच्या दक्षतेमुळे कमी नुकसान झाले आहे. प्रत्येकाने मदतकार्य करण्यासाठी पुढे यावे', असे आवाहन केले आहे.

वाचा-भर दुपारी आलेल्या गूढ आवाजाने बंगळुरू हादरलं; काय झालं नेमकं?

चक्रीवादळ बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलामधील हटिया बेटच्या किनाऱ्यावर पोहोचलं. चक्रीवादळानं किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात कहर माजवला. वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, वीजेचे खांब रस्त्यांवर पडले तर घर आणि अनेक इमारतींची छप्पर उडून गेली आहेत. या चक्रीवादळाचा मोठा फटका पश्चिम बंगालमध्ये बसला आहे. हे नुकसानं एवढं मोठं आहे की शब्दात व्यक्त करता येणार नाही. साधारण 1 लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे पण नेमकं किती नुकसान झालं हे कळायला काही दिवस लागतील असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

First published: May 21, 2020, 12:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading