Super Cyclone Amphan आज घेणार भयंकर रूप...8 राज्यांमध्ये हाय अलर्ट

Super Cyclone Amphan आज घेणार भयंकर रूप...8 राज्यांमध्ये हाय अलर्ट

ओडीसापासून अनेक ठिकाणी ताशी 155 ते 185 किमी वेगानं वारे वाहण्याशी शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मे : पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरून पुढे सरकरणारं 'अंम्फन चक्रीवादळ' (Super Cyclone Amphan) आज रौद्र रुप धारण करेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर 8 राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या अनेक ठिकाणी वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. ओडीसापासून अनेक ठिकाणी ताशी 155 ते 185 किमी वेगानं वारे वाहण्याशी शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदजानुसार पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि समुद्रात चार-पाच मीटर उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. समुद्र किनाऱ्याजवळचे अनेक परिसर रिकामे करण्यात आले असून तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

अंम्फन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळावर उद्या संध्याकाळी 5 पर्यंत सर्व विमानं आणि सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे येत असल्यानं रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली आहेत. एकीकडे कोरोनाचं महासंकट असताना चक्रीवादळाची त्यामध्ये भर पडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ उत्तर आणि वायव्य दिशेने मोठ्या वेगाने पुढे जात आहे. त्याचा वेग आणखी वाढेल असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हाडिया येथे आज दुपारपर्यंत चक्रीवादळ अंम्फान धडकेल. चक्रीवादळ वादळ ओडिशाच्या पारादीप किनार्‍याजवळ येत आहे. पारादीपच्या पूर्व-दक्षिणपूर्वपासून 120 किमी अंतरावर होते. दुपारपर्यंत किनारपट्टीवर धडक बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार चक्रीवादळाचा वेग कमालीचा वाढत आहे. चक्रीवादळ अंम्फान ताशी 200 किलोमीटर वेगाने आपल्या केंद्रात फिरत आहे.

 

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 20, 2020, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading