S M L

पिकाला नजर लागू नये, म्हणून बुजगावण्याच्या जागी चक्क सनी लिओनीचं पोस्टर !

आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातल्या चेंचू रेड्डी या शेतकऱ्यानं हा अनोखा फंडा वापरलाय. यंदा त्याच्या शेतात कोबी आणि फ्लॉवरचं भरघोस पीक आलंय. या पिकाला कुणाची दृष्ट लागायला नको, कुणी ते चोरायला नको, यासाठी त्यानं आपल्या शेतात सनी लिओनीचं बिकिनीतलं मोठं पोस्टर लावलंय

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 14, 2018 06:24 PM IST

पिकाला नजर लागू नये, म्हणून बुजगावण्याच्या जागी चक्क सनी लिओनीचं पोस्टर !

14 फेब्रुवारी: एकेकाळाची हॉट पॉर्नस्टार आणि आताची बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी आंध्र प्रदेशातल्या एका शेतकऱ्याच्या पिकांचं रक्षण करते आहे. आश्चर्य वाटलं ना हे ऐकून...पण हे खरं आहे.

तर झालंय असं की, आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातल्या चेंचू रेड्डी या शेतकऱ्यानं हा अनोखा फंडा वापरलाय. यंदा त्याच्या शेतात कोबी आणि फ्लॉवरचं भरघोस पीक आलंय. या पिकाला कुणाची दृष्ट लागायला नको, कुणी ते चोरायला नको, यासाठी त्यानं आपल्या शेतात सनी लिओनीचं बिकिनीतलं मोठं पोस्टर लावलंय. त्यामुळे लोकांच्या नजरा सनी लिओनीवर खिळतील आणि आपल्या पिकांना दृष्ट लागणार नाही, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे लोकं त्याच्याकडे पाहणार नाहीत. त्यांना दृष्ट लागणार नाही. एवढंच नाही तर त्या पोस्टरवर वाक्य आहे 'लोकहो रडू नका किंवा मला पाण्यातही पाहू नका. आता इथे येणारा जो तो त्या सनी लिओनीच्या पोस्टरकडेच पाहतोय. तिचं सौंदर्य न्याहाळतोय. त्यामुळे तिथं येणारा चोर हा पिकाकडे बघायचं सोडून सनी लिओनीच्याच हॉट आणि बोल्ड पोस्टर बघत बसतो, असा या शेतकऱ्याचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close