सनी देओलनं नितीन गडकरींकडे मागितले 132 कोटी !

सनी देओलनं नितीन गडकरींकडे मागितले 132 कोटी !

सनी देओल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याकडे 132 कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जून : लोकसभा निवडणुकीमध्ये गुरूदासपूरमधून भाजपच्या तिकाटावर विजय मिळवल्यानंतर खासदार सनी देओल यांनी कामाला सुरूवात केली आहे. सनी देओल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे 132 कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली. रावी नदीवर दोन पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. या पुलांच्या उभारणीसाठी सनी देओल यांनी ही मागणी केली आहे.

या पुलांपैकी एका पुलाची मागणी पूर्ण झाल्यास त्याचा फायदा हा 10 गावांना होणार आहे. शेतकरी असलेल्या गावातील लोकांना सध्या पुलाअभावी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुलाअभावी लोकांनी आता उसाची शेती कमी केली आहे.

राहुल गांधींना 15 वर्षे जमलं नाही ते आता स्मृती इराणी करणार!

गावकऱ्यांची मागणी, गडकरींचं आश्वासन

दरम्यान, भेटीवेळी सनी देओल यांच्याकडे गावकऱ्यांनी पुलाच्या बांधकामाची मागणी केली होती. त्यावेळी सनी देओल यांनी देखील काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर सनी देओल यांनी नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्यासमोर समस्या मांडली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी देखील 132.67 कोटी रूपयांचा फंड देण्याची घोषणा केली आहे.

धक्कादायक ! पत्नीला केलेल्या मारहाणीनंतर 4 महिन्यांच्या मुलाचा 3 लाखांना सौदा

नितीन गडकरींची ख्याती

2014मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी कामांचा सपाटा लावला. त्यांच्या कामांचं कौतुक देखील झालं. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची कामं पूर्ण झालेली आहे. शिवाय, दिलेला शब्द पाळण्यामध्ये नितीन गडकरी यांची ओळख आहे.

सोनिया गांधींनी केलं कौतुक

नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक हे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील लोकसभेत केलं होतं. शिवाय, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची जोरदार चर्चा देखील देशात रंगली होती.

अशी आहे जगदगुरू तुकोबारायांच्या पालखीची परंपरा, पाहा EXCLUSIVE रिपोर्ट

First published: June 23, 2019, 3:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading