सुन्नी वक्फ बोर्डाने स्वीकारली अयोध्येतली 5 एकर जमीन, मशिदीसोबत बांधणार हॉस्पिटल

सुन्नी वक्फ बोर्डाने स्वीकारली अयोध्येतली 5 एकर जमीन, मशिदीसोबत बांधणार हॉस्पिटल

सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने सोमवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने मशिदीसाठी देण्यात आलेली 5 एकर जमीन स्वीकारली आहे. सुन्नी वक्फ बोर्ड या जमिनीवर मशिदीसोबतच एक धर्मादाय हॉस्पिटल आणि एक वाचनालयही बांधणार आहे.

  • Share this:

मोहम्मद शबाब

लखनौ, 24 फेब्रुवारी : सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने (Sunni Central Waqf Board)सोमवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने मशिदीसाठी देण्यात आलेली 5 एकर जमीन स्वीकारली आहे. सरकारतर्फे अयोध्येतल्या (Ayodhya) रौनाहीमध्ये मशिदीसाठी जागा देण्यात आलीय. सुन्नी वक्फ बोर्ड या जमिनीवर मशिदीसोबतच एक धर्मादाय हॉस्पिटल आणि एक वाचनालयही बांधणार आहे. त्याचबरोबर हे बोर्ड एका ट्रस्टची स्थापनाही करणार आहे.

सदस्यांचा होता विरोध

याआधी झालेल्या बैठकीत सुन्नी वक्फ बोर्डाच्या 8 पैकी 2 सदस्यांनी मशिदीसाठी जमीन घ्यायला विरोध केला होता पण आता मात्र या बोर्डाच्या सदस्यांनी जमिनीचा स्वीकार करायला सहमती दर्शवली आहे. अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या वादावर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच राम मंदिर होईल तर मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचा निकाल दिला होता. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्टची स्थापना करावी, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते.

(हेही वाचा : VIDEO : प्रोटोकॉल तोडून मोदींनी केलं ट्रम्प दांपत्याचं स्वागत)

5 एकर जागेचा पर्याय

सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने हा निकाल दिला होता. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच इतरत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले आहे. आता ठरलेल्या योजनेप्रमाणे सुन्नी वक्फ बोर्डाने या जागेवर हॉस्पिटल आणि वाचनालय बांधण्याचा निर्धार केला आहे.

=========================================================================================

First published: February 24, 2020, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading