जम्मू-काश्मिरमध्ये सुजवान हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार

जम्मू-काश्मिरमध्ये सुजवान हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार

जैश-ए-मोहम्मद चा कमांडर मुफ्ती वकास अशी त्याची ओळख होती

  • Share this:

05 मार्च : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याच्या कारवाईत सुंजवान हल्याचा मास्टरमाईंड मुफ्ती वकासला ठार मारण्यात यश आलंय. हटवार भागात सैन्यानं ही कारवाई केली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतीपुराच्या हटवार भागात दहशतवादी असल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. बीएसएफच्या जवानांनी राष्ट्रीय रायफल्स दलाला सोबत घेऊन संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुंजवान हल्यामागचा मास्टरमाईंड ठार झालाय. जैश-ए-मोहम्मद चा कमांडर मुफ्ती वकास अशी त्याची ओळख होती. सुंजवान हल्ल्यामागे वकासचा हात होता.

वकास हा सुंजवान, लेटापोरसह अन्य काही दहशतवादी हल्याचा सुत्रधार होता. याआधीही जैश-ए-मोहम्मदचा कमांडर नूर मोहम्मद तंत्रे याला मागील वर्षी 17 डिसेंबरला ठार मारण्यात आलं होतं.

फेब्रुवारी महिन्यात सुंजवा येथील सैन्याच्या तळावर जैश-ए-मोहम्मदने हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

First published: March 5, 2018, 9:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading