Home /News /national /

काँग्रेसला झटका, Facebook Live करुन बड्या नेत्याचा पक्षाला Good Bye

काँग्रेसला झटका, Facebook Live करुन बड्या नेत्याचा पक्षाला Good Bye

काँग्रेस (Congress) पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी उदयपूरमध्ये (Udaipur) तीन दिवसीय 'नव संकल्प शिविर' आयोजित करत आहे. दरम्यान काँग्रेसला पंजाबमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.

    चंदीगड, 14 मे: काँग्रेस (Congress) पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी उदयपूरमध्ये (Udaipur) तीन दिवसीय 'नव संकल्प शिविर' आयोजित करत आहे. दरम्यान काँग्रेसला पंजाबमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी अध्यक्ष सुनील जाखड (former Punjab president Sunil Jakhar) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून (official Facebook page) लाईव्ह करत काँग्रेस सोडण्याची घोषणा केली. पंजाब काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी काँग्रेसमधील जातीय समीकरण लक्षात घेऊन केल्या जात असलेल्या राजकारणावर प्रश्न उपस्थित करत हायकमांडवर निशाणा साधला. त्यांनी काँग्रेस हायकमांडवर आरोप केला की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवल्यानंतर मुख्यमंत्री नियुक्तीच्या मुद्द्यावर पंजाबच्या एका विशिष्ट नेत्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. अंबिका सोनी यांचे नाव घेत सुनील जाखड यांनी सोनिया गांधी यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोठी बातमी: चीन करतोय बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी, Satellite Image आली समोर सुनील जाखड म्हणाले की, त्यांच्या कुटुंबातील 3 पिढ्यांनी 50 वर्षे काँग्रेसची सेवा केली. तरीही त्यांना "पक्षाच्या पध्दतीचे पालन न केल्यामुळे" "सर्व पक्षीय पदांवरून काढून टाकण्यात आले" तेव्हा ते दु:खी झाले. काँग्रेसने नुकतीच सुनील जाखड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षाच्या सर्व पदांवरून हटवले होते. पंजाब काँग्रेसने त्यांना पक्षातून दोन वर्षांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली होती, त्यावर सोनिया गांधी यांना निर्णय घ्यावा लागला. पंजाब कांग्रेस के पूर्व अध्यक्ष सुनील जाखड़ ने पार्टी के साथ अपने संबंध खत्म करने का एलान किया. (File Photo) सुनील जाखड यांनी यापूर्वी 13 मे रोजी उदयपूर येथे पत्रकार परिषद घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी विमानाची तिकिटेही बुक केली होती, मात्र नंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि 14 मे रोजी दुपारी 12 वाजता फेसबुक लाईव्हवर आपलं मत बोलून दाखवलं. चन्नी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने जाखड यांना पाठवली नोटीस नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांच्याबाबत वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसनं सुनील जाखड यांना नोटीस पाठवली होती. त्यांनी या नोटीसला उत्तर दिलं नाही. नोटीस पाठवण्यापूर्वी काँग्रेस हायकमांडने त्यांच्याशी बोलायला हवं होतं, असं जाखड म्हणाले. त्यामुळेच त्यांनी नोटीसला उत्तर दिलं नाही. काँग्रेस हायकमांडपुढे झुकणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. ''आम्ही कोणाच्या रिमोट कंट्रोलनं...'', Navneet Rana पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यासाठी जाखड यांच्या पदावरून हटवण्यात आले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर सुनील जाखड यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू होती. पण अंबिका सोनी यांनी 'शीख राज्य शीख मुख्यमंत्री' असा युक्तिवाद करून जाखड यांच्या उमेदवारीला व्हेटो केला. पंजाबमध्ये काँग्रेसने पहिल्यांदाच हिंदू-शीखांवर चर्चा केल्याने ते नाराज आहेत. तो पंजाबी हिंदू असून पंजाबमध्ये असा भेदभाव कधीच झाला नाही. त्याचवेळी अंबिका सोनी यांच्या हस्तक्षेपामुळे ते त्यांच्यावर नाराज आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Punjab

    पुढील बातम्या