सुनील अरोडा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत सर्वच राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्या आहेत. ही मतदान यंत्र हॅक करता येवू शकतात असा दावाही केला जातो. त्या पार्श्वभूमीवर सर्व शंकाचं निरसन करण्याची जबाबदारी आता अरोडांवर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2018 12:54 PM IST

सुनील अरोडा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : सुनील अरोडा यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून रविवारी सूत्र स्वीकारली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. अरोडा यांची गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली होती.


सुनील अरोडा हे राजस्थान कॅडरचे 1980 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते या आधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यात सचिव म्हणून कार्यरत होते. त्या आधी अरोडा यांनी अर्थ, वस्त्र आणि योजना आयोगात विविध पदावर काम केलं. 1999-2002 या कार्यकाळात ते विमान वाहतूक मंत्रालयात संयुक्त सचिव होते.


अरोरा पाच वर्ष इंडियन एअरलाईन्सचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक होते. त्यातल्या तीन वर्षात त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी होती. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून अरोडा यांच्या कारकिर्दीतली ती सर्वात मोठी जबाबदारी असेल. त्यासाठी निवडणुक आयोग कामाला लागले असून युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे.

Loading...


अरोडा यांनी राजस्थानमधून आपल्या कारकिर्दील सुरूवात केली होती. धोलपूर, अलवर, नागौर आणि जोधपूर इथं ते जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. 1993-1998  या काळात मुख्यमंत्र्यांचे सचिव तर 2005-2008 या काळात मुख्यमंत्र्य्यांचे मुख्य सचिव होते. 2019 च्या लोकसभा हे त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.


ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत सर्वच राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्या आहेत. ही मतदान यंत्र हॅक करता येवू शकतात असा दावाही केला जातो. त्या पार्श्वभूमीवर सर्व शंकाचं निरसन करण्याची जबाबदारी आता अरोडांवर आली आहे.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...