आता हे आहेत देशातले सर्वात शक्तिशाली अधिकारी, पंतप्रधानांवरही कारवाईचा अधिकार

आता हे आहेत देशातले सर्वात शक्तिशाली अधिकारी, पंतप्रधानांवरही कारवाईचा अधिकार

सुनील अरोरा हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त असून त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 10 मार्च  : देशात निवडणुकांची घोषणा झाली आहे. आयोगाने निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर त्याच वेळी देशात आदर्श आचार संहिता लागू होते. या आचार संहितेचं पालन करणं हे प्रत्येक राजकीय पक्षांवर बंधनकारक आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांनाही त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. या काळात देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांना सर्वात जास्त अधिकार असतात. सुनील अरोरा हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त असून त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

आचार संहितेचं उल्लंघन झालं तर मुख्य निवडणूक आयुक्त देशाच्या पंतप्रधानांवरही कारवाई करू शकतात. आयोगाने निवडणूक रद्द केली तर त्यांना पाच वर्ष वाट बघावी लागते. किंवा आयोग निवडणूक लढण्यावरही बंदी घालू शकतात.

कोण आहेत सुनील अरोरा?

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. अरोरा यांनी 2 डिसेंबरला मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यभार स्वीकारला होता. सुनील अरोरा  हे राजस्थान कॅडरचे 1980 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते या आधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यात सचिव म्हणून कार्यरत होते. त्या आधी अरोडा यांनी अर्थ, वस्त्र आणि योजना आयोगात विविध पदावर काम केलं. 1999-2002 या कार्यकाळात ते विमान वाहतूक मंत्रालयात संयुक्त सचिव होते.

अरोरा पाच वर्ष इंडियन एअरलाईन्सचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक होते. त्यातल्या तीन वर्षात त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी होती. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून अरोडा यांच्या कारकिर्दीतली ती सर्वात मोठी जबाबदारी असेल. त्यासाठी निवडणुक आयोग कामाला लागले असून युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे.

अरोडा यांनी राजस्थानमधून आपल्या कारकिर्दील सुरूवात केली होती. धोलपूर, अलवर, नागौर आणि जोधपूर इथं ते जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. 1993-1998  या काळात मुख्यमंत्र्यांचे सचिव तर 2005-2008 या काळात मुख्यमंत्र्य्यांचे मुख्य सचिव होते. 2019 च्या लोकसभा हे त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

First published: March 10, 2019, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading