आज दिवसभरातील महत्त्वाच्या 5 बातम्या

आज दिवसभरातील महत्त्वाच्या 5 बातम्या

आज दिवसभरातील या महत्त्वाच्या बातम्यांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद

- स्वतःला देशाचे चौकीदार मानणाऱ्या लाखो नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ५ वाजता संवाद साधणार आहेत. त्यांच्या या संवादातून ते नेमका का संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील महायुतीचा महामेळावा

- लोकसभेची जोरदार तयारी आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे. कोल्हापूरनंतर आता डोंबिवली आणि कल्याणच्या ग्रामीण भागात युतीच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुंबईत विशेष तयारी करण्यात आली आहे.

21 आदिवासी संघटनेंची पत्रकार परिषद

- नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 21 आदिवासी संघटनेची पत्रकार परिषद आयोजित  करण्यात आली आहे. यावेळी ते कोणता निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बीडमध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर पंकजामुंडे यांची सभा

- लोकसभेची तयारी जोरदार सुरू असताना आता सर्वच पक्षांमध्ये प्रचारांच्या आणि सभेच्या फैरी सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये मेगाब्लॉग असणार आहे.

- रविवार म्हटलं की मुंबईकरांना काळजी असते ती मेगाब्लॉकची. या रविवारीदेखील मुंबईमध्ये मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे.

First published: March 31, 2019, 7:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading