News18 Lokmat

मुंबईत भाजपचा महिला मेळावा... या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या

सुक्षमा स्वराज यांचा मुंबई दौरापासून ते नारायण राणे यांच्या सभेपर्यंतच्या दिवसभरातील टॉप 5 बातम्या

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 06:09 AM IST

मुंबईत भाजपचा महिला मेळावा... या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या

मुंबईत भाजपचा महिला मेळावा

मुंबईच्या षण्मुखानंद इथे रविवारी भाजपचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मेळाव्याच्या व्यासपीठावरून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, निवडणुकांच्या दृष्टीकोनातून भाजपचा हा महिला मेळावा महत्त्वाचा मानला जातो.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्य-अहवालाचा ई- प्रकाशन सोहळा

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्या अहवालाचा ई- प्रकाशन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

निवडणुकांच्या आधी विकास कामांचं उद्घाटन

Loading...

कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होई शकतात. पण त्याआधी भाजपकडून मोठ्या प्रमाणात विकास कामांचं उद्घाटन करण्यात घेत आहे. रविवारी भांडूप इथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि खासदार किरीट सोमय्या उपस्थित राहणार आहेत.

निलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे आणि विजया राहटकर यांची एकाच व्यासपीठावर मुलाखत

​रविवारी पुण्यात पत्रकार पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे पुण्याच्या अण्णाभाऊ साठे या सभागृहात शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे आणि महिला आयोग अध्यक्षा विजया राहटकर यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

रत्नागिरीत नारायण राणे यांची सभा

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या सभांचा धडाका सुरू आहे. यात आता स्वबळाचा नारा दिलेल्या स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची रविवारी रत्नागिरीमध्ये सभा असणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात एकटेच उतरलेले नारायण राणे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


VIDEO :15 फूट खोल नाल्यात पडली गाय, असं केलं रेस्क्यू आॅपरेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2019 06:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...