सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी आरोपी म्हणून शशी थरुर यांना कोर्टाचं समन्स

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी त्यांचे पती शशी थरुर यांना न्यालयाने आरोपी ठरवलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2018 04:16 PM IST

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी आरोपी म्हणून शशी थरुर यांना कोर्टाचं समन्स

नवी दिल्ली, ता. 05 जून : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी त्यांचे पती शशी थरुर यांना न्यालयाने आरोपी ठरवलं आहे. पटियाला हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्राची दखल घेत शशी थरुर यांना आरोपी ठरवण्यात आलं आहे. या आरोपपत्राखाली थरूर यांना 498ए अंतर्गत शिक्षा होऊ शकते. या संदर्भात शशी थरुरना कोर्टाने नोटीसही पाठवली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 जुलैला होणार आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, सुनंदाने त्यांच्या पतीला पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी लिहंल होत की त्यांचं जगण्याची इच्छा संपली आहे. त्यामुळे सुनंदा यांच्या या मेलला आपण मृत्यूची घोषणा केल्याचं म्हणजेच 'Dying Declaration' म्हणू शकतो असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.

काय आहे सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण?

सुनंदा पुष्कर यांनी 8 जानेवारी 2014ला त्यांचे पती शशी थरुर यांना ई-मेला केला होता. आणि त्यात त्यांनी लिहलं की, 'मला जगण्याची इच्छा नाही आहे. मी फक्त मरणाच्या प्रतिक्षेत आहे.' या मेलच्या अगदी 9 दिवसांनंतर सुनंदा दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये मृत अवस्थेत सापडल्या होत्या.

शशी थरुर हे सुनंदा यांचं तीसरे पती होते. त्यांच्या लग्नाला 3 वर्ष 3 महिने झाले होते. या सगळ्यावर दिल्ली पोलिसांनी संशय घेत शशी थरुर यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केलं.  याची दखल घेत कोर्टाने शशी थरुर यांना आरोपी ठरवलं आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 03:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...