सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: थरूरांनी पाक महिला पत्रकारासोबत घालवली होती रात्र!

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: थरूरांनी पाक महिला पत्रकारासोबत घालवली होती रात्र!

सुनंदा पुष्कर (Sunanda Pushkar) मृत्यू प्रकरणात काँग्रेस (Congress)चे नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या अचडणी वाढत चालल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट: सुनंदा पुष्कर (Sunanda Pushkar) मृत्यू प्रकरणात काँग्रेस (Congress)चे नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या अचडणी वाढत चालल्या आहेत. या प्रकरणी दिल्लीतील राऊज एव्हन्यू कोर्टात सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसां (Delhi Police)नी पुष्कर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी थरूर यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी केली.धक्कादायक म्हणजे सुनावणी दरम्यान पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार सोबत थरुर यांचे संबंध आणि दुबईत सुनंदा आणि थरुर यांच्यात झालेल्या वाद हा देखील मुद्दा समोर आला.

घरातील नोकरांनी दिलेल्या माहितीनुसार सुनंदा आणि शशी थरुर यांच्यात नेहमी भांडण होत असे. पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यावरून दोघांच्यात मोठे वाद होत असे, अशी माहिती घरातील नोकराने दिल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. याच मुद्द्यावरून दुबईत देखील दोघांच्यात भांडण झाले होते. हे भांडण पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु होते, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. दोघांच्यात वाद होत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी घरचा नोकर आणि सुनंदाचे जवळच्या लोकांचे जबाब कोर्टात सादर केले. दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितले की, शशी थरूर यांच्यावर पत्नी सुनंदा यांच्या हत्येचा खटला चालवला जावा. जर कोर्टाने आदेश दिले तर थरूर यांच्याविरुद्ध तसा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.

आई कधीच आत्महत्या करणार नाही

शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांचा हा तिसरा विवाह होता. सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन यांनी एसडीएम समोर दिलेल्या साक्षीमध्ये असे म्हटले होते की, माझी आई कणखर होती. त्यामुळे ती कधीच आत्महत्या करणार नाही. अशाच प्रकारची साक्ष सुनंदाचे भाऊने देखील दिली होती. सुनंदा यांचा मृत्यू होण्याआधी त्या तणावात होत्या असे त्यांनी पोलिसांना सांगितले होते.

थरूर यांनी केला होता रोमॅण्टिक मेसेज

सुनंदा यांनी शशी थरूर यांचे बीबीएम चॅटमधील मेसेज वाचले होते. ज्यात मेहर तरारला रोमॅण्टिक मेसेज केले होते. विशेष म्हणजे मेसेजमध्ये सुनंदाला घटस्फोट देण्यासंदर्भात देखील चर्चा केली होती. पत्रकार नलिनी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, थरूर यांनी मेहर सोबत दुबईत एक रात्र घालवल्याचे सुनंदाने सांगितले.

सुनंदा सोबत झाला होता वाद

सुनंदाचे मित्र सुनील टकरू यांनी दिल्ली पोलिसांना दिल्ल्या माहितीनुसार, पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारवरून वाद झाला होता. सुनंदाने थरूर यांना उघडे पाडण्याची धमकी दिली होती. सुनंदाच्या या धमकीमुळे ते तणावात होते. सुनंदा यांना एक तर विष दिले अथवा त्यांनी घेतले असेल. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 08:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading